संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मराठवाड्यात तर या प्रकरणामुळे सरळ सरळ दोन समाजाचे गट पडल्याचे दिसून येत आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला म्हणून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. त्याल मिळणारा प्रतिसाद पाहाता सरकारवही दबाव वाढला आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून जे आक्रोश मोर्चे निघाले आहेत त्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्रमक भूमीका घेतली जात आहे. त्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तर घरात घुसून मारण्याची धमकी दिली. तर आपच्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाचा कसा वापर केला जात आहे हेच सांगितले. यामुळे धनंजय मुंडे यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांचे समर्थक आता रस्त्यावर उतरले आहेत. बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्या बाहेर मुंडेंचे शेकडो समर्थक एकत्र आले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात आक्षेपर्ह वक्तव्य केल्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण पोलिस स्टेशन सोडणार नाही अशी भूमीकाच मुंडे समर्थकांनी घेतली आहे. अशा स्थितीत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय रंग येतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
परभणी इथे आक्रोश मोर्चा झाला होता. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार टीका केली होती. धनंजय मुंडे यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. शिवाय बीड आणि परळी भागात मराठा समाजाच्या लोकांवर मुंडे समर्थकांकडून हल्ले होत आहेत. ही बाब लक्षात घेता जर मराठा समाजावर परळी बीडमध्ये अन्याय झाला तर परभणी आणि धाराशीवमध्ये घराघरात घुसून मारू अशा दम मनोज जरांगे पाटील यांनी भरला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी आक्षेप नोंदवला आहे. शिवाय असे चिथावणी खोर भाष्य केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे.
दुसरीकडे समाजसेविका अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडें बरोबरच पंकजा मुंडे यांनाही घेरलं आहे. धनंजय मुंडे हे वंजारी समाजाचा आपल्या स्वार्थासाठी वापर करत आहेत असा आरोप केला होता. शिवाय आपल्याला धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते जीवे मारण्याची धमकी देत आहेत. तसे फोन कॉल आपल्याला येत आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला मुंडेंच्या माणसांकडून धोका होवू शकतो असंही त्या म्हणाल्या. शिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोण कसं गुंतलं आहे याचा पाढाही त्यांनी वाचला होता. काही दिवसापूर्वी तर त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालया पुढे ठिय्या आंदोलनही केलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधातही मुंडे समर्थक आक्रमक झाले आहेत.