Digvijay Singh : दिग्विजय सिंह यांनी अचानक का केलं BJP आणि RSS चं कौतुक? काँग्रेसमध्ये खळबळ, वाचा Inside Story

Digvijay Singh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा सुरु झालीय.

जाहिरात
Read Time: 3 mins
Digvijay Singh : ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टनं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
मुंबई:

Digvijay Singh : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह सध्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा सुरु झालीय. या पोस्टमध्ये त्यांनी थेट भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) संघटन शक्तीचं कौतुक केलंय. पण हे कौतुक केवळ वरवरचे नसून त्यामागे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाचे अनेक पदर दडलेले आहेत. विशेषतः सी़डब्ल्यूसी म्हणजेच काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीपूर्वी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं?

दिग्विजय सिंह यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या पायापाशी बसलेले दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी लिहिले की, आरएसएसचा जमिनीवर काम करणारा स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता नेत्यांच्या चरणाशी बसून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनला, हीच संघटनेची ताकद आहे. दिग्विजय सिंह यांचे हे विधान काँग्रेससाठी एक आरसा दाखवण्यासारखे मानले जात आहे.

काँग्रेस नेतृत्वाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न

दिग्विजय सिंह यांच्या या पोस्टचा थेट संबंध काँग्रेसमधील सध्याच्या कमकुवत संघटनात्मक रचनेशी जोडला जात आहे. भाजप आणि आरएसएसचे केडर बेस मॉडेल आणि शिस्त याची तुलना त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसशी केली आहे. काँग्रेसमध्ये जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर समित्या वेळेवर तयार होत नाहीत, याकडे त्यांनी अनेकदा लक्ष वेधले आहे.

 सत्तेचे विकेंद्रीकरण होत नसल्याची तक्रार त्यांनी यापूर्वीही अनेक बैठकींमध्ये केली आहे. त्यामुळे हा केवळ एक फोटो नसून आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाला दिलेला कठोर सल्ला असल्याचे बोलले जात आहे.

( नक्की वाचा : Dombivli News : ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजवणार, शिंदेंचा ठाकरेंवर डोंबिवलीतून थेट प्रहार, युतीबाबत म्हणाले.. )

आतील कारण काय?

या सर्व घडामोडींमागे दिग्विजय सिंह यांची वैयक्तिक राजकीय गणिते देखील असू शकतात. त्यांचा राज्यसभेचा दुसरा कार्यकाळ जानेवारी 2026 मध्ये संपत आहे. तिसऱ्या टर्मसाठी त्यांना पुन्हा संधी मिळेल का, याबाबत सध्या पक्षात साशंकता आहे.

Advertisement

 मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या कमलनाथ आणि मीनाक्षी नटराजन यांच्यासारखे मोठे नेते देखील शर्यतीत आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी आणि उमंग सिंघार यांच्याशी दिग्विजय सिंह यांचे फारसे पटत नसल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत पक्षात आपले महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी हे दबावतंत्र वापरले असल्याची चर्चा आहे.

(नक्की वाचा : New Labour Code 2025: पगार, सुट्ट्या आणि पेन्शन... नोकरीचे सर्व नियम बदलणार,वाचा 10 मोठे बदल )
 

राहुल गांधींना सल्ला आणि पक्षातील अस्वस्थता

दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना देखील संघटनेकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला होता. प्रदेशाध्यक्ष नेमले जातात पण खालच्या पातळीवर टीम तयार होत नाही, ही त्यांची प्रमुख खंत आहे. मात्र, पंतप्रधान मोदी आणि आरएसएसचे कौतुक केल्यामुळे काँग्रेसमधील इतर नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. दिग्विजय सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीने जाहीरपणे दुसऱ्या संघटनेचे गुणगान गाणे, हे पक्ष नेतृत्वाला कितपत रुचेल हा आता मोठा प्रश्न आहे.
 

Topics mentioned in this article