Eknath Shinde Exclusive: नाराजी नाट्य, दिल्लीवारी ते महापालिका निवडणूका! एकनाथ शिंदे बेधडक बोलले

लोकशाहीत कुणाला ही कोणा सोबत जाता येते. बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत असं शिंदे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 4 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले आहे.
  • आगामी महापालिका निवडणुकां महायुती एकत्रीत लढणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्याच्या मागे हा आपण उभे राहीलो.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नागपूर:

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी, मित्रपक्षाबाबतची नाराजी, आगामी महापालिका निवडणूका, एकमेकांवर केलेल्या टीका या पार्श्वभूमीवर एकनाथ  शिंदे  NDTV मराठीसोबत दिलखुलास पणे बोलले. 'NDTV मराठी'मंचच्या 'अनस्टॉपेबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येक धडक प्रश्नांना त्यांनी बेधकड पणे उत्तर दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही मतभेद आहेत का यावर ही त्यांनी स्पष्ट शब्दात आपली प्रतिक्रीया दिली आहे. शिवाय आपली दिल्लीवारी कशासाठी होती याचे ही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणूकांबाबत त्यांनी मोठे भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर मविआवर ही टीकेची झोड उठवली. शिवाय आपल्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यालाही त्यांनी उजाळा दिला. 

भाजप आणि आपल्यात कोणताही तणाव नव्हता असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  कार्यकर्ते एकमेकां समोर उभे राहीले होते. आम्ही ठरवलं होतं काही ठिकाणी युती करायची. पण काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलो. मी कधी ही कोणावर नाराजी दर्शवली नाही. माझी नाराजी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांना त्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबतही विचारण्यात आले. त्याला ही त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले.  मी दिल्लीला इथले प्रश्न घेवून जातो का? मी एनडीएचा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. मोदी- शहा मला बोलवत असतात. त्यावेळी बिहार सरकारचा शपथविधी होता. त्याचं निमंत्रण आपल्याला  होतं. त्यासाठी दिल्लीला गेलो होतो असं ते म्हणाले. दिल्ली भेटीबाबत  प्रश्न ही तुमचेच आणि उत्तर ही तुमची. फक्त पतंग उडवायचे असं ही शिंदे यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा - Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे सतत दिल्लीला का जातात? CM नी सांगितलं कारण, 2029 बाबत मोठी घोषणा

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जे काही झाले त्याबाबत मी नाराजी दर्शवली नाही. मात्र एकमेकांचे कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घेतले जात होते. याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोललो. त्यात यापुढे एकमेकांचे कार्यकर्ते आपल्या पक्षात घ्यायचे नाहीत असं ठरलं आहे. शिवाय या पुढच्या निवडणुका युतीने लढायचं असं ही ठरलं आहे. शिवाय आगामी सर्व महापालिका निवडणूका या आम्ही युतीतच लढणार असल्याचं ही शिंदे यांनी स्पष्ट करत सर्व चर्चांनाच पूर्ण विराम दिला आहे. या निवडणुकीत तुमच्यावर टिका झाली यावर बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री असताना ही आरोप प्रत्यारोप केले गेले. पण मी त्याकडे लक्ष दिलं नाही. माझा फोकस कामाकडे होता. आरोपाला आरोपाने उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देणार म्हणून ऐवढे प्रकल्प केले असं ही शिंदे यावेळी म्हणाले.

Advertisement

नक्की वाचा - Latur-Mumbai : लातूरहून निघा अन् 5 तासात मुंबई गाठा! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा Exclusive Video

 काहींना मी मुख्यमंत्री झालेलं पचनी पडत नाही. आता उपमुख्यमंत्री म्हणून आवडत नाही. त्याला मी काय करू असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.  लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण या निवडणुकीत मविआचे आम्हाला कोणीच प्रचारात दिसले नाहीत. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती. अशा वेळी काही नेते घरात होते. त्यांनी कदाचित पराभव मान्य केला होता. या कार्यकर्त्यांच्या निवडणूका होत्या. त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे होते. हा एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहीला. त्यामुळे आम्ही कोणाची स्पेस घेतला नाही. ज्याने त्याने ठरवायचे स्पेस घ्यायची की सोडयची असं म्हणत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला टोला लगावला. 

नक्की वाचा - Pune Land Scam : FIR मध्ये नाव नाही म्हणजे... मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर पार्थ पवारांचं वाढणार टेन्शन!

शिंदे पुढे म्हणाले की निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही. आम्ही धडाधड काम करत आहे. निवडणुकांची चिंता आम्हाला नाही. लोक सुज्ञ आहे. त्यांना माहित आहे काम करणारे कोण आणि घरी बसणारे कोण? त्यांनी ठाकरेंना यावेळी टोला लगावण्याची संधी सोडली नाही. या निवडणुकीत तरी फेसबूकवर सभा घ्यायला हव्या होत्या असं ते म्हाणाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार त्यावर ही शिंदे बोलले. कुणाच्या आघाडी युतीची आम्हाला काळजी नाही. पण लोकं- मतदार हे सुज्ञ आहेत. लोकांसमोर आमचे काम आहे. त्यामुळे महायुती महापालिका निवडणूका जिंकणार.आमचा ब्रँड काम आहे. आम्ही कामाला महत्व देतो. लोकशाहीत कुणाला ही कोणा सोबत जाता येते. बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत. त्यांच्या विचारावरच आम्ही पुढे गेलो आणि सरकार बनवलं. लोकांनी ते स्विकारलं. ज्यांनी विचार सोडले त्यांना लोकांनी निवडणुकीत जागा दाखवली अशी टीकाही शिंदे यांनी यावेळी केली.