Rahul Shewale NDTV Power Play Conclave Interview : "कोस्टल रोड हा 1970 पासूनचा प्लॅन आहे. गेले कित्येक वर्षे मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कोणताही त्यात पुढाकार घेतला नाही.ही खोदलेली माती समुद्रात रेक्लेम केली तर कोस्टल रोडची कॉस्ट कमी होईल. आम्ही संकल्प केला की, मुंबई महापालिकेतर्फे तो कोस्टल रोड तयार करायचा. साधारण 15-20 हजार कोटींचा प्रकल्प असेल,तर त्याला केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं किंवा राज्य सरकारकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं.वर्ल्ड बँक किंवा प्रायव्हेट बँकाकडून अर्थसहाय्य घ्यावं लागतं.ते घेत असताना त्यांच्या अटी बंधनकारक असतात.म्हणून आम्ही यावेळी विचार केला की, मुंबईकरांवर कोणता भार द्यायचा नाही.भविष्यातही त्यावर टोल नसणार. हा रोड टोल फ्री बनवायचा आणि महानगरपालिकेच्या स्वत:च्या आर्थिक सहाय्याने तो बनवायचा", अशी मोठी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. ते एनडीटीव्ही कॉन्केल्व्हमध्ये एनडीटीव्ही मराठी डिजिटलचे संपादक श्रीरंग खरे यांच्याशी संवाद साधताना बोलत होते.
राहुल शेवाळे पुढे काय म्हणाले?
"जे विकासक चोरीचा एफएसआय वापरायचे,त्यांच्याकडून प्रिमियम घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या निर्णयामुळे विकासकांनाही त्याचा फायदा झाला. ज्या चोरी व्हायच्या त्यापण बंद झाल्या.मुंबई महानगरपालिकेलाही आर्थिक फायदा झाला. त्या प्रिमियमच्या माध्यातून मुंबई महापालिकेला प्रत्येक वर्षी 2000 कोटी रुपये मिळाले. मग आम्ही नवीन हेड ओपन करून ते 2000 कोटींची प्रत्येक वर्षी बचत केली. त्याला मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये कधीही वापरले नाहीत. अशी चार-पाच वर्ष बचत केल्याने त्यात 10-15 हजार कोटी जमा झाले. त्या पैशांच्या आधारे कोस्टल रोडचं टेंडर काढण्यात आलं आणि कोस्टल रोड बनवण्यात आला. त्यावेळी मी चेअरमन होतो आणि सुबोधकुमार आयुक्त..आम्ही जर तो निर्णयच घेतला नसता. तर तो कोस्टल रोड झालाच नसता",असंही राहुळ शेवाळे यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> "माता-भगिनींना दीड दीड हजार रुपये देतात, पण नशा..", छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे कडाडले!
शिवसेना उबाठाने करून दाखवलं अशी जाहीरात केली
याविषयी शिवसेना उबाठाने करून दाखवलं अशी जाहीरात केली, त्यावर प्रतिक्रिया देताना शेवाळे म्हणाले,"त्यावेळी उद्धव साहेबांना मीच या कोस्टल रोडची माहिती दिली होती. त्यांना तर डीपी रिझर्व्हेशन 1970 चं कोस्टल रोडचं माहितच नव्हतं. त्यांनाच मी आणि सुबोधकुमार यांनी प्रेझेंटेशन दिलं.त्यांना या गोष्टी सांगितल्या. परंतु, त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. त्यांनी कोस्टल रोडला लागणाऱ्या परवानग्या मिळवून दिल्या. ते खूप अडचणीचं काम होतं."