जाहिरात

"माता-भगिनींना दीड दीड हजार रुपये देतात, पण नशा..", छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे कडाडले!

"तुमच्याकडे सरकार आहे ना..संभाजी नगर नशामुक्त बोलताय. त्या साताऱ्यात एका नशेच्या ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकली. ती फॅक्टरी कोणाची होती,जाहीर का नाही करत..कसे करणार तुम्ही नशामुक्त?"असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

"माता-भगिनींना दीड दीड हजार रुपये देतात, पण नशा..", छत्रपती संभाजी नगरमध्ये उद्धव ठाकरे कडाडले!
Uddhav Thackeray On BJP

Uddhav Thackeray Today Speech :  "तुमच्याकडे सरकार आहे ना..संभाजी नगर नशामुक्त बोलताय. त्या साताऱ्यात एका नशेच्या ड्रग्ज फॅक्टरीवर धाड टाकली. ती फॅक्टरी कोणाची होती,जाहीर का नाही करत..कसे करणार तुम्ही नशामुक्त? तुमच्यातच काही गुन्हेगार बसले असतील, केवळ सत्येसाठी तुम्हाला त्यावर पांघरूण घालावं लागत असेल,तर तुम्ही माझ्या महाराष्ट्राला नशामुक्त कसं करणार? हे माझ्या माता-भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. दीड दीड हजार रुपये देतात. पण नशा सगळीकडे पसरवतायत.दीड हजारात तुमचं मत घेत आहेत.तुमचं आयुष्य घेत आहेत. तुमच्या आयुष्याची किंमत दीड हजार रुपये होऊ शकत नाही. नुसता पैसा फेको आणि मत विकत घ्यायचे,हे तुम्हाला मतांची किंमत नाही, तुमच्या आयुष्याची किंमत आहे", अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर केली आहे. ते छत्रपती संभाजी नगर येथे प्रचारसभेत बोलत होते. 

"महाराष्ट्र नव्हे, देश अराजकाच्या दिशेनं चालला आहे"

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "माझ्या महाराष्ट्रातील माणसं, माझ्या संभाजी नगरमधील माणसं, माझ्या मुंबईतील माणसं हे सगळे जण ह्यांच्या भूलथापांना बळी पडत आहेत. महाराष्ट्र नव्हे, देश अराजकाच्या दिशेनं चालला आहे.संभाजी नगर कर्जबाजारी केलेला आहे.मी अभिमानाने सांगत होतो की मुंबई महानगरपालिकेत 92 हजार कोटींच्या ठेवी आपण करून दाखवल्या होत्या. राज्य सरकार किंवा केंद्राचा एकही पैसा न घेता तो कोस्टल रोड बनवून दाखवला होता.

नक्की वाचा >> Trending News: दोन शेजारी..दोन हत्या! दोघांच्या हत्येचं एकच कारण, अख्ख्या देशाला हादरंवून टाकणारी घटना

'3 लाख कोटी आणणार कुठून?' उद्धव ठाकरेंचा सवाल

"आज वाट लावून टाकली. 70 हजार कोटींपर्यंत त्या ठेवी खाली आणल्या. मुंबईकरांवर 3 लाख कोटींचं देणं करून ठेवलं आहे. आणणार कुठून? ज्या दिशेनं आपण चाललेलो आहोत. ह्यांच्यात हातात परत ही महापालिका गेली,उद्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पैसे द्यायला महापालिकेकडे पैसे नसतील. संभाजीनगरमध्येही रस्तेही खोदून ठेवलेत, असं मला वाटतंय. मग आपण श्वास कसला घेतोय विचार करा. विकास आम्हाला जरूर पाहिजे. पण नियोजनबद्ध विकास पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून पैसै घेणारा विकास नको आहे", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> Viral Video : तरुणीने हॉटेलचं रुम बुक केलं अन् नंतर घडला भयानक प्रकार! 5 मिनिटांतच उघडकीस आलं की..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com