20 hours ago

Operation Tiger Updates:  गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले 'ऑपरेशन टायगर' अखेर यशस्वी झालं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार फुटले असल्याचा दावा करण्यात येत आहे. या सहा खासदारांचा वेगळा गट स्थापन झाल्याची माहिती आहे. 

तर ठाकरे गटाकडे आता फक्त तीन खासदार शिल्लक आहेत. ही पक्षांतर बंदी बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय. या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी ठाकरे गटानं सुरु केलीय.

Advertisement

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेगानं बदलत असलेल्या या घडामोडींची सर्व अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा. 

 

Jun 17, 2026 20:11 (IST)

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर पूर्ण, अधिकृत घोषणा कधी? शिंदे गटाकडून मोठी माहिती

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर पूर्ण झाले असून ठाकरे गटाच्या सहा खासदारांची पत्रावर सही असल्याचा शिंदे गटाचा दावा. पण कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्याशिवाय अधिकृत घोषणा 19 किवा 20 जूनला होणार आहे, अशी माहिती 'NDTV मराठी' ला सूत्रांनी दिली आहे.  

ठाकरे गटाच्या कायदेशीर हालचाली लक्षात घेऊन पुढची पावलं टाकण्यात येणार आहेत. त्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय. 

Jun 17, 2026 18:13 (IST)

Operation Tiger LIVE: 'ऑपरेशन टायगर'ला ब्रेक लागणार? ठाकरे गटाच्या दाव्यानं नवा ट्विस्ट

Operation Tiger LIVE: शिवसेना उबाठा पक्षातील खासदार फोडण्यासाठी राबवण्यात येत असलेलं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा यापूर्वी करण्यात आला होता. पण, ठाकरे गटानं हा दावा खोडत प्रतिदावा केला आहे.

शिवसेनेसोबत सहा खासदार नसल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. शिवसेना शिंदेसोबत गेल्याचा दावा होत असलेल्या  सहापैकी दोन खासदारांनी आपली आश्वासन पूर्ण झाली नाहीत त्यामुळे सहीच केली नसल्याची माहिती ठाकरे गटातील सुत्रांनी दिली आहे 

ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्व खासदारांसाठी उद्याच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. या बैठकीला किती आणि कोणते खासदार येणार यावरच याबाबतचं नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे. 

Advertisement
Jun 17, 2026 15:49 (IST)

Operation Tiger LIVE: ठाकरे गटाला बसणार आणखी एक धक्का! खासदारांपाठोपाठ मुंबईतील नगरसेवकही फुटणार?

Operation Tiger LIVE: राज्यातील ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार फुटल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर आता मुंबई महापालिकेतही ठाकरे गटाला धक्का बसू शकतो, असे संकेत मिळत आहेत.

शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी हा इशारा दिलाय. मुंबई महापालिकेत ठाकरेंचे 65 नगरसेवक आहे. उद्धव ठाकरे यांचे केवळ खासदारच नव्हे, तर आमदार, नगरसेवक आणि कार्यकर्तेही नाराज असून अनेक जण त्यांची साथ सोडत असल्याचा दावाच खासदार म्हस्केंनी केला.

Jun 17, 2026 14:56 (IST)

Operation Tiger LIVE: 'ऑपरेशन टायगर'मध्ये शिंदेंची थेट एन्ट्री, मंत्री खासदारांना दिली मोठी सूचना

Operation Tiger LIVE:'ऑपरेशन टायगर'मोहिमेचे प्रमुख शिल्पकार असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. ऑपरेशन टायगरवर शिवसेनेत कोणीही बोलू नये, अशी सूचना शिंदे यांनी शिवसेनेचे सर्व मंत्री तसंच आमदारांना दिलीय.

  

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयातून उद्धव ठाकरे गटाच्या 6 खासदारांना वेगळा गट स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यानंतर शिंदे यांनी हा आदेश दिलाय.

शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री यांनी 'ऑपरेशन टायगर' बाबत माध्यमांशी संवाद साधू नये, अशी सक्त सूचना शिंदे यांनी दिली आहे. शिवसेना पक्षातील ठराविक नेतेच या विषयावर माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

Jun 17, 2026 14:29 (IST)

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगर यशस्वी, 6 खासदारांचा वेगळा गट स्थापन

Operation Tiger LIVE:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील खासदार फोडण्याबाबत राबवण्यात येत असलेले ऑपरेशन टायगर अखेर यशस्वी झालं आहे. उबाठा पक्षाचे नऊ पैकी सहा खासदार फुटले आहेत. या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा सभापतींनी मान्यता दिल्याची माहिती आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाकडं फक्त आता तीन खासदार आहेत. राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तीनच खासदार आता ठाकरेंच्या पक्षात शिल्लक आहेत. 

Jun 17, 2026 13:18 (IST)

Operation Tiger LIVE: अरविंद सावंत कोणावर भडकले?

Advertisement
Jun 17, 2026 11:29 (IST)

Shivsena UBT PC: "3 मिनिटांत 4 वेळा साईबाबांची शपथ", संजय राऊत संतापले, दिला थेट इशारा (येथे क्लिक करा)

Shivsena UBT PC: शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांच्या कथित बंडखोरीच्या आणि एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'च्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांना कडक इशारा दिला आहे.

Jun 17, 2026 11:26 (IST)

Operation Tiger LIVE: पत्रकार परिषद संपताना अरविंद सावंत भडकले

पत्रकार परिषद संपताना अरविंद सावंत भडकले

उद्धव ठाकरे नेत्यांना वेळ देत नसल्याच्या प्रश्नावर संतापले

दावा करणाऱ्यांचं नाव घेऊनच बोला-अरविंद सावंत

दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्येच वादावादी

Advertisement
Jun 17, 2026 11:17 (IST)

Operation Tiger LIVE: ओमराजे निंबाळकर यांच्यावर दबाव, संजय राऊत यांचे मोठे विधान

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात काल निकाल होता, आमच्याकडे अशी माहिती आली की तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्या गटात सामील व्हा असा ओमराजेंवर दबाव टाकला, त्यामुळे दोन दिवस निकाल पुढे ढकलला गेला: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे मोठे विधान

Jun 17, 2026 11:14 (IST)

Operation Tiger LIVE:...तरीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे: अरविंद सावंत, खासदार शिवसेना

सर्व खासदार आपल्यासोबत असल्याचे आदित्य ठाकरेंनी काल म्हटले, तरीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे: अरविंद सावंत, खासदार शिवसेना (UBT)

Jun 17, 2026 11:12 (IST)

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगरचे कॅप्टन संजय देशमुख: सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Jun 17, 2026 11:03 (IST)

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगरसंदर्भात शिवसेनेच्या संजय राऊत यांची पत्रकार परिषद

खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले
  • हे खासदार, आमदार किंवा अन्य कोणी पूर्णपणे शिवसेना उबाठा पक्षावर निवडून आले
  • आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले असताना कोणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही
  • याक्षणी आम्ही कोणावरही आरोप करत नाही. मागे जे काही झालं त्याची पुनरावृत्ती झाली तर महाराष्ट्रातील जनता, शिवसैनिक गप्प बसणार नाही, जो राडा व्हायचा तो होईल
  • मातोश्रीवरील 14 जून रोजीची बैठक नियमित बैठक होती. सावंत, देसाई, राजाभाऊ आमि संजय दिना पाटील होते बाकीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होते. त्यावेळी एका खासदाराने 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. 3 मिनिटांत 4 वेळा साईबाबांची शपथ घेतली. मरेपर्यंत तुमच्यासोबत राहीन असं साईबाबांची शपथ घेऊन सांगितलं.
  • एकाने आई भवानीची शपथ घेतली मी तुमच्यासोबत आहे, एकाने मुलीची, एकाने आईची शपथ घेतली, एकाने बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली. त्यामुळे विश्वास ठेवणे अनिवार्य आहे.

Jun 17, 2026 10:58 (IST)

Operation Tiger LIVE: शिवसेना फुटीचा काय आहे इतिहास

Jun 17, 2026 10:53 (IST)

Operation Tiger LIVE: भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका

Jun 17, 2026 10:45 (IST)

Operation Tiger LIVE: एकनाथ शिंदे यांचा 'ऑपरेशन टायगर' बाबत CM देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय : सूत्र

एकनाथ शिंदे यांचा 'ऑपरेशन टायगर' बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय

एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून दिल्ली गाठली : सूत्र 

दिल्लीत घडामोडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समन्वय साधून पुढची पावलं : सूत्र 

Jun 17, 2026 10:42 (IST)

Operation Tiger LIVE: संजय राऊत पांढऱ्या पायाचा माणूस: मंत्री गुलाबराव पाटील

राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेल्या कथित ‘ऑपरेशन टायगर’वर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘ऑपरेशन टायगर’बाबत मला कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट करताना त्यांनी संजय राऊत यांना ‘पांढऱ्या पायाचा माणूस’ म्हणत, त्यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून संबंधित पक्षाची अधोगती सुरू झाल्याची टीका केली. तसेच संजय राऊत यांचा ‘पांढरा पाय काळा कसा होईल’ याकडे लक्ष दिले पाहिजे, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे.

Jun 17, 2026 10:39 (IST)

Operation Tiger LIVE: खासगी विमानाने फिरण्याएवढी किंमत ठाकरे नामामुळे वाढली,ऑपरेशन टायगरवरून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांची टीका

Jun 17, 2026 10:36 (IST)

Operation Tiger LIVE: संजय राऊत यांना शिवसेना आमदार, खासदार काँग्रेसमध्ये विलीन करायचे होते :आशिष देशमुख

  • संजय राऊत यांना शिवसेना आमदार, खासदार काँग्रेसमध्ये विलीन करायचे होते
  • भाजप आमदार आशिष देशमुख यांचे विधान
  • उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याचा प्लॅन होता
  • यामुळे ठाकरेंचे खासदार नाराज झाले असावे: आशिष देशमुख
  • याबाबत आपल्याकडे पक्की माहिती असल्याचा देशमुखांचा दावा  

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर काही सनसनाटी विधाने ऐकायला येऊ लागली आहेत. भाजप आमदार आशिष देशमुख यांनी म्हटलंय की संजय राऊत यांना शिवसेना पक्षाचे आमदार खासदार काँग्रेसमध्ये विलीन करायचे होते. ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच हाच प्लॅन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत होता आणि या विलीनीकरणानंतर शरद पवार यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळेल आणि उद्धव ठाकरे प्रदेशाध्यक्ष होतील असं विधान देशमुख यांनी केले आहे. घडामोडींमुळे नाराज होऊनच ठाकरे गटाचे खासदार कदाचित लोकसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी दिल्लीला आले असावेत असे देशमुखांचे म्हणणे आहे.

Jun 17, 2026 09:58 (IST)

Operation Tiger LIVE: ऑपरेशन टायगरवर सर्वात मोठी बातमी NDTV मराठीवर

  • ऑपरेशन टायगरवर सर्वात मोठी बातमी NDTV मराठीवर
  • वाजे, सावंत, देसाई सोडून इतर खासदार शिंदेंकडे जाणार-सूत्र
  • राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, अनिल देसाई ठाकरेंकडेच राहणार-सूत्र
  • एकनाथ शिंदेंकडे ठाकरे सेनेचे 6 खासदार जाणार असल्याची चर्चा

Jun 17, 2026 09:57 (IST)

Operation Tiger LIVE: खासदारांनी बंडखोरी केल्यास ठाकरे करणार कारवाई

  • खासदारांनी बंडखोरी केल्यास ठाकरे करणार कारवाई
  • ठाकरेंच्या शिवसेनेने बोलावली सर्व खासदारांची बैठक
  • पक्षाच्या बैठकीला दिल्लीत हजर राहण्याची नोटीस
  • खासदार उपस्थित राहिले नाहीत तर हकालपट्टी होणार

Jun 17, 2026 09:46 (IST)

Operation Tiger LIVE:ऑपरेशन टायगरची चर्चा, शरद पवार गटाने घेतला धसका

  • ऑपरेशन टायगरची चर्चा, शरद पवार गटाने घेतला धसका
  • पक्षाच्या खासदारांसोबत वरिष्ठ नेत्यांचा संपर्क
  • शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून खासदारांसोबत संवाद
  • पुढच्या काही दिवसात बैठकही घेणार असल्याची माहिती

Jun 17, 2026 09:45 (IST)

Operation Tiger LIVE: एकनाथ शिंदेंची कायदेशीर सल्लागार टीम दिल्लीत दाखल

  • एकनाथ शिंदेंची कायदेशीर सल्लागार टीम दिल्लीत दाखल
  • कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टीम दिल्लीमध्ये
  • कायदेशीर कचाट्यात प्रक्रिया न अडकण्यासाठी शिंदे अलर्ट
  • शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची पुण्यातही चर्चा
  • शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरेंची पुण्यात बॅनरबाजी
  • 'ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण, जस्ट वेट अँड वॉच'

Jun 17, 2026 09:44 (IST)

Maharashtra Politics LIVE: 'ओमराजे निंबाळकरांचा पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही'

  • 'ओमराजे निंबाळकरांचा पक्षप्रवेशाचा निर्णय झालेला नाही'
  • 'मुलाची तब्येत बरी नसल्याने ओमराजे पु्ण्यातच'
  • धाराशिवचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांचं स्पष्टीकरण
  • 'पक्षप्रवेशाबाबत ओमराजेंकडून कोणतेही संकेत नाहीत'

खासदार ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेना प्रवेशाचा निर्णय झालेला नाही. तसे संकेतही ओमराजेंकडून मिळाले नाहीत असं स्पष्टीकरण धाराशिवचे ठाकरे सेनेचे शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी दिलंय. मुलाची तब्येत बरी नसल्याने ओमराजे पुण्यातच असल्याचीही माहिती सोमनाथ गुरव यांनी दिलंय. 

 

Jun 17, 2026 09:43 (IST)

Maharashtra Politics LIVE: ओमराजे निंबाळकरांच्या शिवसेना पक्षप्रवेशाबाबत तूर्तास कोणताही निर्णय झालेला नाही

  • ओमराजेंचा पक्षप्रवेशाबाबत तूर्तास कोणताही निर्णय नाही-सूत्र
  • पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतरच पुढील दिशा ठरणार-सूत्र
  • शिवसेना पक्षप्रवेशाचा निर्णय निकालावरच अवलंबून-सूत्र
  • निकालाची तारीख लांबल्याने ओमराजेंचा निर्णय नाही-सूत्र

ओमराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाबाबत तूर्तास कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पवनराजे निंबाळकरांच्या हत्याकांड निकालानंतरच ओमराजे पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती मिळतेय. पवनराजे निंबाळकर हत्याकाडांचा निकाल काल लागणार होता. मात्र हा निकाल आता 20 जूनला लागणार आहे. निकालाची तारीख लांबल्याने निंबाळकरांचा सध्या तरी कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र पक्षप्रवेशाचा निर्णय हा निकालावरच अवलंबून असल्याची माहिती मिळतेय.

Jun 17, 2026 09:42 (IST)

Uddhav Thackeray News LIVE: ठाकरे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार

  • ठाकरे गटाचे खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार
  • सकाळी 11 वाजता खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटणार
  • खासदार अरविंद सावंत लोकसभा अध्यक्षांना देणार पत्र

Jun 17, 2026 09:41 (IST)

Operation Tiger LIVE:खासदार संजय दीना पाटील यांनी NDTV मराठीशी फोनवर बोलताना दिली माहिती

  • खासदारांची उद्या  बैठक आहे. मी बैठकीला उपस्थित राहणार आहे  
  • पक्षाची भूमिका अरविंद सावंत आणि संजय राऊत मांडतील 

Jun 17, 2026 09:38 (IST)

Operation Tiger LIVE:बंडखोर खासदारापैकी एकाला मिळणार मंत्रिपद ?

बंडखोर खासदारापैकी एकाला मिळणार मंत्रिपद? 

परभणीचे खासदार संजय ( बंडू ) जाधव यांना आश्वासन दिल्याची माहिती 

ठाकरेच्या खारदारांना प्रतिनिधित्व खासदार संजय (बंडू) जाधव यांनी केल्याची माहिती

Jun 17, 2026 09:16 (IST)

Operation Tiger LIVE: उद्धव ठाकरेंचे खासदार का आहेत नाराज?

  1. सरकारकडून मतदारसंघातल्या कामांना प्रतिसाद मिळत नाही
  2. दिल्लीतही फारशी कोणी दखल घेत नसल्याचीही तक्रार
  3. पक्ष नेतृत्त्वाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही
  4. मुंबई वगळता इतर महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाचा प्रभाव नाही
  5. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फेकला गेला
  6. तब्येतीमुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करू शकत नाही मात्र आदित्य ठाकरेंचं काय?
  7. खासदाराच्या पत्नीच्या निधनानंतरही उद्धव ठाकरेंचा फोन नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र फोन करुन खासदाराचं केलं सांत्वन. दुःखद प्रसंगातही उद्धव ठाकरे सोबत नसल्याची खासदाराची खंत

Jun 17, 2026 08:58 (IST)

Operation Tiger LIVE: ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश ठरला?

उद्धव ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश ठरला?

19 जूनला ठाकरेंच्या खासदारांचा शिवसेनेत प्रवेश?

शिवसेनेच्या वर्धापन दिनी होणार खासदारांचा पक्षप्रवेश?

ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत करणार पक्षप्रवेश?

Jun 17, 2026 08:56 (IST)

Operation Tiger LIVE: ठाकरेंचे 6 खासदार, शिंदेंसोबत लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट: सूत्र

  • राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप
  • ठाकरेंचे 6 खासदार, शिंदेंसोबत लोकसभा अध्यक्षांची घेणार भेट
  • ओम बिर्लांच्या भेटीनंतर स्वतंत्र गट स्थापन करणार-सूत्र
  • ठाकरेंच्या 6 खासदारांची शिंदेंसोबत दिल्लीत गुप्त बैठक

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार नॉट रिचेबल असून ते दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेकडून पुन्हा एकदा  'ऑपरेशन टायगर' राबवलं जात असल्याची चर्चा आहे. दिल्लीतल्या घडामोडींना वेग आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा रात्रीच दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत दिल्लीत गुप्त बैठक घेतल्याचीही माहिती मिळतेय. या बैठकीला श्रीकांत शिंदेही उपस्थित होते अशी माहिती मिळतेय. ठाकरे गटाचे हे सर्व खासदार ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे खासदार लोकसभेत आधी आपला एक स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील आणि त्यानंतर हा गट शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात विलीन केला जाईल.

Jun 17, 2026 08:49 (IST)

Operation Tiger Shiv Sena: ठाकरे सेनेचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याचा दावा करणार?

'गुवाहाटी'नंतर आता चलो दिल्लीचा अंक?

उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार दिल्लीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मध्यरात्री दिल्लीत-सूत्र

एकनाथ शिंदे यांचा दिल्लीतूनच रात्री राजस्थानचा दौरा-सूत्र

एकनाथ शिंदे यांची रात्रीच खासदारांसोबत गुप्त बैठक-सूत्र

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चलो गुवाहाटी नाट्याचा नवा अंक रंगताना दिसतोय. मात्र यंदा गुवाहाटीऐवजी चलो नवी दिल्ली हे नवं नाटक रंगणार आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार नॉट रिचेबल असून ते दिल्लीत दाखल झाल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेकडून पुन्हा एकदा  'ऑपरेशन टायगर' राबवलं जात असल्याची चर्चा आहे. दिल्लीतल्या घडामोडींना वेग आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा रात्रीच दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांसोबत दिल्लीत गुप्त बैठक घेतल्याचीही माहिती मिळतेय. आज सकाळी ठाकरे सेनेचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याचा दावा करू शकतात असा दावाही सूत्रांनी केलाय.

Jun 17, 2026 08:38 (IST)

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे 6 खासदार 'नॉट रिचेबल', एकनाथ शिंदेंचं दिल्लीत 'ऑपरेशन टायगर'? बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार 'नॉट रिचेबल' झाले असून, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.