सस्पेन्स संपला! रुसलेले शिंदे अखेर उपमुख्यमंत्री होण्यास तयार, सामंतांनी केली घोषणा

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे सहभागी होणार की नाही? ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स शपथविधीला काही तास शिल्लक असतानाही कायम होता. तो सस्पेन्स आता संपला आहे. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या नावाची शिफारस केलेल पत्र राजभवनावर दिल्याचं हीत्यांनी सांगितलं. एकानाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार, नेते, शिवसैनिकांनी केलेल्या विनंतीला मान देत हा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. साडेपाच वाजता शपथविधी होणार आहे. त्या आधी एकनाथ शिंदे यांना आम्ही सर्वांनी कळकळीची विनंती केली होती. ज्या योजना तुम्ही सुरू केल्या त्या तेवढ्याच ताकदीने पुढे गेल्या पाहीजेत. त्यासाठी तुम्ही सरकारमध्ये असणे गरजेचे आहे. असं त्यांना सांगण्यात आलं. त्यामुळे शिंदे यांनी सर्वांचा मान राखत आपण उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर आपण देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचे सामंत म्हणाले. शिवाय शिंदेच्या उपमुख्यमंत्रिपदाचे शिफारस पत्र राजभवनवर दिल्याची माहितीही सामंत यांनी दिली.    

ट्रेंडिंग बातमी -  चाट्या, गद्दार! काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारावर नेटकऱ्यांनी केली टीका

त्यामुळे एकानाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार हे स्पष्ट आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते असंही ते म्हणाले. खाते वाटपावरून वाद असल्याची चर्चा चुकीची असल्याचंही ते म्हणाले. खाते वाटप महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसून करतील असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांचे राजकीय योगदान मोठे असल्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळात राहीलं पाहीजे असं आम्हाला वाटत होतं. त्याचा त्यांनी मान राखला असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - शपथविधी सोहळ्यापूर्वी मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

दरम्यान एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्यास तयार नव्हते. त्या ऐवजी पक्षप्रमुख म्हणून संघटनेचं काम करण्याचा त्यांना मानस होता. संपूर्ण राज्यात फिरून संघटना मजबूत करण्यावर त्यांचा भर होता. तशी भावनाही त्यांनी व्यक्त करून दाखवली होती. पण आम्हाला ते मान्य नव्हतं. त्यांनी सत्तेत असलं पाहीजे अशी आमच्या सर्वांची भावना होती. सत्तेत राहूनही ते संघटनेसाठी काम करू शकतात असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यांनी आमच्या सर्वांची इच्छा आता पूर्ण केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी होणार आहे. अन्य कोणत्याही मंत्र्याचा आज शपथविधी होणार नाही. 

Advertisement