उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआचं सरकार पडलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ठाकरे यांनी लक्ष्य करण्याचा धडाका लावला. ठाकरेंचे सरकार म्हणजे स्थगितीचे सरकार असं हिणवायला सुरूवात केली. मेट्रोपासून ते धारावी पुनर्विकास अशा प्रत्येक योजनेला स्थगिती दिल्याचा आरोप शिंदे करत होते. पुढे शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळा एक नाही तर अनेक योजनांची घोषणा केली. पण आता त्याच योजना बंद केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडन होत आहे. त्यामुळे शिंदे यांची कोंडी झाली आहे. एकीकडे स्थगिती सरकार बोलणाऱ्या शिंदे यांच्यावर आता योजना बंदचा थप्पा मारला जात आहे. पण शिंदे मुख्यमंत्री असताना घोषीत केलेल्या किती योजना खरोखर बंद झाल्या आहे. त्यांची सध्याची स्थिती काय आहे. कोणत्या योजना सुरू आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना नव नव्या योजना जाहीर करण्याचा धडाका लावला होता. त्या पैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 1500 रूपये दिले जातात. ही योजना जाहीर करण्यात आली त्याच वेळी त्यांनी अन्य योजना ही जाहीर केल्या होत्या. त्यात आनंदाचा शिधा, माझी सुंदर शाळा, स्वच्छता मॉनिटर, 1 राज्य 1 गणवेश, लाडक्या भावाला अपरेंटीसशिप, योजनादूत योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा योजनांचा धडाका लावला होता. आता या योजनांचे काय झाले आहे हा खरा प्रश्न आहे.
नक्की वाचा - Raj and Uddhav Thackeray: महापालिका निवडणुका पुढे ढकलणार? ठाकरे बंधू काय म्हणाले?
माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करत या योजनांवरून शिंदे यांना घेरलं आहे. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील. शिंदेंच्या या योजना बंद असं म्हणत त्यांनी शिंदें च्या काळातील कोणत्या कोणत्या योजना बंद झाल्या आहेत त्याची लिस्टच मांडली आहे. त्यात ते पुढील प्रमाणे मांडणी करतात.
- 1. आनंदाचा शिधा- बंद!
- 2. माझी सुंदर शाळा - बंद!
- 3. 1 रुपयात पीकविमा - बंद!
- 4. स्वच्छता मॉनिटर - बंद!
- 5. 1 राज्य 1 गणवेश - बंद!
- 6. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!
- 7. योजनादूत योजना - बंद!
- 8. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद!
योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू. असं ट्वीट अंबादास दानवे यांनी केले आहे. त्यांनी हे ट्वीट केल्यानंतर राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. शिंदे मुख्यमंत्रिपदावरून बाजूला होताच त्यांनी सुरू केलेल्या या सर्व योजना खरोखर बंद झाल्यात का हा खरा प्रश्न आहे. या योजनांना निधी मिळतोय का हा ही प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यातून एक रूपयात पीकविमा ही योजना एकनाथ शिंदे यांना आणली नव्हती हे स्पष्ट झाले आहे. बाकीच्या योजना मात्र एकनाथ शिंदे यांच्या काळातच जाहीर करण्यात आल्या होत्या हे सत्य आहे. ते नाकारता ही येणार नाही.
या योजना पैकी आनंदाचा शिधा ही योजना सरकारने बंद केली आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी झटका मानला जात आहे. गोरगरीबांसाठी सणासुदीला हा आनंदाचा शिधा दिला होता होता. तो आता मिळणार नाही. बाकीच्या सहा योजना सध्या तरी कागदोपत्री अस्तित्वात आहेत. त्या बंद जरी करण्यात आल्या नसल्या तरी त्या कागदावर आहेत. पण त्यांना दिला जाणार निधी मात्र कमी झाला आहे. निधीचा प्रश्न या योजनांना भेडसावत आहेत. लाडक्या बहीण योजनेवर होणार खर्च पाहाता अन्य योजनांना निधी कमी पडत आहे. त्याचाच फटका शिंदेंच्या या अन्य योजनांना बसल्याचं स्पष्ट होत आहे. या योजना जरी सुरू असल्या तरी त्या किती प्रभावी पणs राबवल्या जात आहेत याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.