शेतकरी नेते एकमेकांना भिडले, नेमकं कारण काय?

तुपकरांनी शेट्टींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यावर पहिल्यांदाच राजू शेट्टी व्यक्त झाले आहेत.

Advertisement
Read Time: 3 mins
बुलढाणा:

अमोल गावंडे 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी आणि संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यातील वाद सध्या पेटला आहे. हे दोन्हीही शेतकरी नेते सध्या एकमेकांना भिडलेले दिसतात. या दोन्ही शेतकरी नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांवर टिकेची झोड उठवली आहे. राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन तुपकरांची हकालपट्टी केली. त्यानंतर तुपकरांनी शेट्टींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. त्यावर पहिल्यांदाच राजू शेट्टी व्यक्त झाले आहेत. तर तुपकरांनीही तातडीने शेट्टी यांच्यावर पलटवार केला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
     
लोकसभा निवडणुकीनंतर रविकांत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यानंतर तुपकरांनी राजू शेट्टींवर अनेक आरोप केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रमुख आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेले रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात भूमिका घेतली हेाती. राजू शेट्टी यांनी शब्द देऊनही अनेक वेळा मला बुलडाण्याची जागा मिळू दिली नाही. असा आरोप तुपकर यांनी केला होता. शेट्टींनी 2014 मध्ये भाजपसोबत युती केली. त्यावेळी बंडखोरी करू नका, असे सांगितले. त्यानंतर राजू शेट्टींनी मला 2019 मध्ये लोकसभेची तयारी करायला सांगितले. मात्र, जागा न सुटल्याने पुन्हा थांबायला सांगितले. त्या वेळी मला आमदारकीचा शब्द दिला होता. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांची चळवळ टिकली पाहिजे म्हणून मी माघार घेतली,असे रविकांत तुपकर यांनी म्हटले होते.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - महायुतीचा विधानसभा निवडणुकीसाठी मेगा प्लॅन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून ठरवली योजना

रविकांत तुपकरांच्या या आरोपांवर राजू शेट्टींनी मात्र अद्यापही उत्तर दिले नव्हते. मात्र ते बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलतांना, मी अश्या किरकोळ आरोपांना भीक घालत नाही. माझे कार्यकर्ते या आरोपांना उत्तर देतील, असे शेट्टीं म्हणाले. तुम्ही दोघेही शेतकरी नेते आहाता. असे असताना तुमच्या कोणत्या कारणामुळे वाद झाला असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारण्यात आला. त्यावर तुम्ही हे तुपकरांनाच विचारा असे शेट्टी म्हणाले. त्यामुळे शेट्टी आणि तुपकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट होत आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  शेख हसीनांनी बांगलादेश सोडला, भारतात आल्या, सोबत किती संपत्ती आणली?

 राजू शेट्टी हे रविकांत तुपकर यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. त्यांनी त्यांच्यावर बोलणंही टाळलं. त्यातून आपण तुरकरांना जास्त महत्व देत नाही हेच शेट्टींना दाखवायचं होतं. याबाबत तुपकर यांना विचारलं असता त्यांनीही शेट्टींवर पलटवार केला. ते म्हणाले की ज्यांचे लोकसभा निवडणुकीमध्ये डिपॉझिट गेलं, शेतकऱ्यांनी ज्यांना घरी बसवलं, अशा लोकांना मी गांभीर्याने घेत नाही असं म्हणत शेट्टींच्या जखमेवरच मिठ चोळलं. शिवाय मी त्यांनी गांभीर्याने घेत नाही, माझेच कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील असंही तुपकर यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण'नंतर आता 'लाडकी मोलकरीण' योजना; शिंदे सरकार मोठ्या घोषणेच्या तयारीत?

राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर हे दोघेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते. सदाभाऊ खोत यांनी शेट्टींची साथ सोडल्यानंतर रविकांत तुपकर यांनी शेट्टी यांना साथ दिली. ही जोडी चांगली जमली होती. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक या दोघांनीही लढवलीय. राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढवली. तर रविकांत तुपकर यांनी बुलडाणात लढत दिली. दोघांचाही पराभव झाला. शेट्टी यांचे डिपॉझिट जप्त झाले. तर रविकांत तुपकर यांनी जोरदार लढत दिली.

Advertisement