विदर्भातला भाजपचा बडा नेता काँग्रेसच्या गळाला, पक्षप्रवेश झाला निश्चित

2004 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदार संघातून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा विदर्भातला बडा नेता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. माजी खासदार शिशुपाल पटले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदार संघातून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. पोवार समाजाचे नेते म्हणून शिशुपाल पटले यांची ओळख आहे. भंडार गोंदीया मतदार संघात त्यांची मोठी ताकद आहे. याचा फायदा विधानसभेला काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

शिशुपाल पटले मुंबईत दाखल झाले आहे. शुक्रवारी  टिळक भवनात 11 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. पोवार समाजाचे सर्वात मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. या समाजाची भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मोठया प्रमाणात ताकद आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत देखील बऱ्यापैकी ताकद आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला या समाजाचा फटका बसू शकतो असे बोलले जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शिवबंधन सोडलं, ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश, ठाकरेंच्या वरळीत काय घडलं?

शिशुपाल पटले 2024 च्या 'लोकसभा निवडणुकीपर्यंत भाजप सोबत एकनिष्ठ राहिले. मात्र पक्षाच्या संगठनेने तसेच नेतृत्वाने त्यांना कार्यक्रमात न बोलावणे, पत्रिकेत नाव न टाकणे, ते आल्यास त्यांना मंचावर स्थान नं देणे, भाषण न करू देणे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा पदोपदी अपमान करणे, डावलणे असा शिशूपाल पटले यांचा आरोप आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  

ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत आहे. विधानसभा निवडणूक लढण्यास पटले हे तयार नव्हते. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना निवडणुकीसाठी तयार केले आहे. पटले यांना काँग्रेसकडून  तुमसर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.  तुमसर येथे अजित पवार गटाचे राजू कारेमोरे विद्यमान आमदार आहेत.

Advertisement