जाहिरात

शिवबंधन सोडलं, ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश, ठाकरेंच्या वरळीत काय घडलं?

आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदार संघात अशी एक घटना घडली आहे त्यामुळे अनेकांच्या भूवयाच उंचावल्या आहेत.

शिवबंधन सोडलं, ऑन द स्पॉट मनसेत प्रवेश, ठाकरेंच्या वरळीत काय घडलं?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीचा रंग आता हळूहळू चढू लागला आहे. अनेक नेते या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. काही जण अजून चाचपणी करत आहेत. तर काहींनी पक्षही बदलले आहेत. काही जण वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. पण आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदार संघात अशी एक घटना घडली आहे त्यामुळे अनेकांच्या भूवयाच उंचावल्या आहेत. जसजशी निवडणूक पुढे सरकेल त्यानुसार अशा अनेक घटना राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतील अशी आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.  

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातून मनसेचे संदिप देशपांडे हे निवडणूक लढवणार आहेत. त्याबाबत राज ठाकरे यांनी संकेतही दिले आहेत. त्यामुळे संदिप देशपांडे यांनी वरळीत भेटीगाठीचे कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यांचा वरळीतला वावरही वाढला आहे. ते वरळीच्या नागरिकांच्या समस्या सध्या जाणून घेत आहेत. या दरम्यान संदिप देशपांडे हे शिवसेना ठाकरे गटाते गट प्रमुख निलेश ठोंबरे यांच्या घरी धडकले. 

ट्रेंडिंग बातमी - मविआचं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

त्यावेळी निलेश ठोंबरे हे त्यांच्या घरी होते. त्यांच्यावर ठाकरे गटाच्या गट प्रमुखपदाची जबाबदारी आहे. लोकसभेतही त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे काम केले. ज्यावेळी संदिप देशपांडे हे ठोंबरे यांच्या घरी आले त्याच वेळी निलेश यांनी आपल्या हातावर बांधले शिवबंधन सोडले. त्याच वेळी त्यांनी मनसेत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. शिवबंधन तोडून त्यांनी ऑन दी स्पॉट मनसेत प्रवेश केला. त्यांच्या या पक्ष प्रवेशाची चर्चा सध्या वरळीत चांगलीच रंगली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - बारामतीतून अजित पवारांची माघार? निवडणूक न लढण्याचे कारण काय?

संदिप देशपांडे वरळीतून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाल्यानंतर मतदार संघात शिवसेना विरूद्ध मनसे यांच्या संघर्षाचे प्रसंग आले आहे.  त्यामुळे गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जांभोरी मैदानात  ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही  विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com