'तिकीट मिळो ना मिळो निवडणूक लढविणारच' मविआमध्ये मालेगावात पेच

शेख यांनी काँग्रेसला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मालेगाव:

विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. त्या आधी विधानसभेच्या जास्तीत जास्त जागांवर मित्रपक्षांकडून दावा केला जात आहे. त्यात आता मालेगाव मध्य विधानसभे मतदार संघावरून पेच निर्माण झाला आहे. हा मतदार संघ मागील वेळी काँग्रेसच्या ताब्यात होता. काँग्रेसकडून आसिफ शेख यांनी निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. एमआयएमचा आमदार इथून विजयी झाला होता. त्यानंतर शेख यांनी काँग्रेसला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता ते पुन्हा या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल अपक्ष मैदानात उतरून असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी समोर हा तिढा कसा सोडवायचा हा प्रश्न पडला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आसिफ शेख यांनी 2014 मध्ये मालेगाव मध्ये विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ते काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला होता. 2019 ला ही त्यांनी याच मतदार संघातून निवडणूक लढवली. पण त्यात त्यांना पराभव स्विकारावा लागाल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. पण सत्ता असूनही कामे होत नाहीत म्हणून आसिफ शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी तक्रार करत नाराजीही व्यक्त केली होती. आसिफ शेख यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.    

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - शिळफाटा : पुजाऱ्यांनी बलात्कार अन् हत्या केलेल्या महिलेला न्याय मिळणार!  मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या सूचना 

  हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. मात्र शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी हवी आहे. त्यांनी काही झाले तरी निवडणूक लढवायची असा निर्धार केला आहे. तिकीट मिळो ना मिळो निवडणूक लढविणारच असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असं त्यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीर केले आहे.  काँग्रेसने या जागेवर दावा आधीपासूनच केला आहे. अशा वेळी शेख यांनी घर वापसीही होवू शकते अशी चर्चा सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या मतदार संघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. काँग्रेसच्या शोभा बच्छाव या विजयी झाल्या होत्या. लोकसभेत मिळालेल्या यशाने काँग्रेसचा विश्वास वाढला आहे.