Harshvardhan Jadhav: पोलिसाच्या कानशिलात लगावणे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना पडलं महागात

त्यांनी त्या रागाच्याभरात पोलिस निरिक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

माजी आमदार आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले नेत  हर्षवर्धन जाधव यांना कोर्टाने दणका दिला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावणं त्यांना चांगलच महागात पडलं आहे. या प्रकरणी कोर्टाने जाधव यांना दोषी ठरवलं आहे. शिवाय त्यांना एक वर्षाची कारावासाची शिक्षा ही सुनावली आहे. हर्षवर्धन जाधव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते पुन्हा एकदा या मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.  

हे प्रकरण 2014 सालचे आहे. त्यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. त्यावेळी हॉटेल प्राईडमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू होती. या बैठकीला हर्षवर्धन जाधव ही आले होते. मात्र त्यांना आत जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तिथे सुरक्षेसाठी असलेले पोलिस निरिक्षक पराग जाधव यांनी हर्षवर्धन जाधव यांना रोखलं. त्यामुळे हर्षवर्धन यांना राग आला. 

नक्की वाचा - Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडोला जबरा पर्याय! आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप

त्यांनी त्या रागाच्याभरात पोलिस निरिक्षक पराग जाधव यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणात  न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जारी केला होता. 17 फेब्रुवारी रोजी जाधव न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली होती. नंतर त्यांना जामीनही मंजूर झाला होता.  त्याच प्रकरणाचा निकाल आज बुधवारी लागला. 

नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'बामदास छमछम'! भास्कर जाधवांनी रामदास कदमांना दिलं नवं नाव, केला मोठा गौप्यस्फोट

जिल्हा न्यायालयाने या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना दोषी ठरवलं आहे. शिवाय त्यांना एक वर्षाचा कारावासही सुनावला आहे. त्यामुळे त्यांना आता जेलमध्ये जावं लागणार आहे. मात्र त्यांना वरच्या कोर्टाच अपिल करण्याची मुभा आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे हर्षवर्धन जाधव हे जावई होते. कन्नडचे ते माजी आमदार आहेत. ते मनसेत असताना या मतदार संघातून विजयी झाले होते. दरम्यान या प्रकरणी  शासनातर्फे ॲड. चारुशीला पौनिकर यांनी, हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी बाजू मांडली.

Advertisement