जाहिरात

Shivsena: 'उद्धव-राज एकत्र आल्यानंतर शिंदेंनी ही त्यांच्या सोबत जावं' 'या' ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला सल्ला

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज- उद्धव एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ही त्यांच्यासोबत एकत्र यावं.

Shivsena: 'उद्धव-राज एकत्र आल्यानंतर शिंदेंनी ही त्यांच्या सोबत जावं' 'या' ज्येष्ठ शिवसैनिकाने दिला सल्ला
मुंबई:

सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. जर हे दोघे बंधू एकत्र आले तर शिवसेना आणि मनसेची मुंबईतली ताकद नक्कीच वाढणार आहे. शिवाय मुंबईवरील ठाकरे कुटुंबाचा असलेली पकड आणखी मजबूत होण्यासही मदत होणार आहे. अशा वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे. ते एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही त्यांच्या सोबत जावे असं त्यांनी सांगितलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किर्तीकर यांनी यावेळी बोलताना अनेक गोष्टी सांगितल्या. शिवसेनेचे तरुण नेतृत्व असणाऱ्या राज ठाकरे यांनी त्यावेळी शिवसेना सोडली. याचं दुःख असंख्य शिवसैनिकांना त्यावेळी झालं होतं असं किर्तीकर म्हणाले. राज- उद्धव यांनी एकत्र यावं ही सगळ्यांची इच्छा आहे. बाळासाहेबांनी जी शिवसेना स्थापन केली, ती शिवसेना पुन्हा उभारी घेईल याच्यावर माझा विश्वास आहे असं ही ते यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील असंख्य कार्यकर्ते आहेत हे सांगायला ही ते विसरले नाहीत. 

ट्रेंडिंग बातमी - Raj and Uddhav Thackeray: अजबच आहे हे! आता जनता आठवली का ? मनसे नेत्याच्या विधानामुळे खळबळ

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की राज- उद्धव एकत्र आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ही त्यांच्यासोबत एकत्र यावं, अशी मनोमन आपली इच्छा आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. त्याशिवाय भक्कम आणि एकजूट शिवसेना कधीच मिळणार नाही.  बाळासाहेबांनी उभी केलीली शिवसेना महाराष्ट्राला मिळवायची असेल तर या तिघांनीही एकत्र येणे गरजेचे आहे असं ही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे एनडीए सोबत आहेत. त्यांची शिवसेना भाजप प्रणित आहे. तर उद्धव ठाकरे इंडिया आघाडी सोबत आहेत. त्यामुळे त्यांची शिवसेना काँग्रेस प्रणित आहे. असं ही ते यावेळी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Raj News: 'हो आम्ही घाबरलोय'! ठाकरे एकत्र येणार यावर राणे थेट बोलले

आम्हाला काँग्रेस प्रणित किंवा भाजप प्रणित शिवसेना नको असं ही त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं. जी शिवसेनेची मुळे ओळख होती तिच शिवसेना आम्हाला हवी आहे असं ही ते म्हणाले. त्यासाठी गटातटात विभागली गेलेली शिवसेना पुन्हा एकसंध झाली पाहीजे. त्यातच शिवसेनेचे भले आहे. त्यातूनच शिवसेनेची ताकद ही वाढणार आहे असं किर्तीकर म्हणाले. किर्तीकर हे शिवसेनेचे जेष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या यावक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तूळात उमटणार हे नक्की आहे. शिवाय सध्या ते शिंदे गटात आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रीया येते ते ही पाहावं लागणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com