मोठा खुलासा! माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात का?

माजी मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी खाकी उतरून खादी चढवण्याचा निर्णय का घेतला याचा मोठा खुलासा NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीतून केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याच निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. खाकी उतरवून खादी अंगावर चढवण्याचा निर्णय पांडे यांनी का घेतला याची चर्चा आता प्रशासकीय सेवा आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राजकारणात येण्याची पांडे यांची महत्वकांक्षा लपून राहीलेली नाही. त्यांनी तसा प्रयत्नही या आधी केला होता. पण त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. आता मात्र ते पूर्ण तयारीने रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी खाकी उतरून खादी चढवण्याचा निर्णय का घेतला याचा मोठा खुलासा NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीतून केला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

राजकारणात याआधी संधी हुकली  

शासकीय सेवेत आपण काम करत होतो. त्यावेळी गव्हर्मेंट सर्वंट म्हणून आपली ओळख होती. पण आपणच का गव्हर्मेंट होवू शकत नाही असा विचार मनात सुरू होता असे संजय पांडे यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. सरकारमध्ये आपण असलं पाहीजे यातूनच राजकारणात येणारा विचार केला असेही ते म्हणाले. 2004 साली राजकारण्याच येण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रयत्नही केले. लोकसभेच्या मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. पण त्यात यश आले नाही. तर 2009 साली मायावतींच्या बीएसपीने उमेदवारी देवू केली होती. पण त्यात विजय मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे निवडणूक लढलो नाही असे त्यांनी सांगितले. पुढे 2014 साली निवडणूक लढण्याची संधी होती पण शासकीय सेवेत परतल्याने निवडणूक लढता आली नाही. मात्र यावेळी निवडणूक लढण्याचा निर्धार आपण केल्याचे त्यांनी सांगितले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...

राजकारणात प्रवेश का? 

सध्या राजकारणात पारदर्शकता नाही. जनतेशी कोणालाही देणेघेणे नाही. एकदा निवडून गेले की पाच वर्षे कोणी जनतेकडे पाहात नाही. शिवाय अनेक निवृत्त कर्मचारी आहेत. त्यांचा हक्काचा माणून विधीमंडळात नाही. जो त्यांचे प्रश्न मांडेल. शिक्षक प्रतिनिधी, पदविधर प्रतिनिधी विधान परिषदेत असतात. तसा प्रतिनिधी पोलिसांचा कोणीही नसतो. याबाबत अनेक लोकां बरोबर चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार आपण विधानसभेची निवडणूक लढण्याचे निश्चित केले आहे असे त्यांनी सांगितले. मला भेटण्यासाठी कोणाला माझी वेळ घेण्याची गरज राहाणार नाही. कधीही तुम्ही तुमच्या समस्या घेवून मला भेटू शकता असेही ते या निमित्ताने म्हणाले.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

'कोणत्याही पक्षाशी संबध नाही' 

आपण कोणत्याही राजकीय पक्षाच्यावतीने निवडणूक लढणार नसल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले आहे. मी कोणत्याही राजकीय नेत्याच्या जवळचाही नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचा माणूस असल्याची पांडे यांच्यावर टीका होत होती. मात्र त्यांनी ही टीका फेटाळून लावली आहे.  मी ज्यावेळी पोलीस महासंचालक होतो, त्यावेळी ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात रहावे लागत होते. निवृत्त झाल्यानंतरही त्यांना भेटलो होते. पण त्यांच्या बरोबर कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय ठाकरेंकडूनही आपल्याला राजकारणात येण्यासाठी कोणतही ऑफर नव्हती असे ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीत घमासान, वाद पेटणार?

शासकीय सेवेत असताना वाईट अनूभव 

सरकारी सेवेत असताना आपल्याला वाईट अनुभव आल्याचे संजय पांडे यांनी सांगितले. जर एखाद्या अधिकाऱ्याला अशी वाईट वागणूक मिळत असेल तर सर्व सामान्य कर्मचाऱ्याला कशी वागणूक मिळत असेल असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी सरकारी सेवेतून  बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र आता सरकारमध्ये येवून स्वत: सरकार बनण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.