Exclusive: 'हनी ट्रॅपबाबत खुलासा होऊन जाऊ द्या',गिरीश महाजन यांचे आव्हान

महाजन पुढे म्हणाले की या कथीत हनीट्रॅपच्या सर्व गोष्टी समोर यायला पाहीजे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

प्रांजल कुलकर्णी 

राज्यभरात गाजत असलेल्या नाशिकच्या कथित हनी ट्रॅप प्रकरणी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी NDTV मराठीशी बोलताना धक्कादायक माहिती दिली आहे. नाशिकमधील तो हॉटेलवाला आहे, जो रुममध्ये कॅमेरे बसवतो. राजपत्रित अधिकाऱ्यांना तिथे बोलवतो. अनेक आजी-माजी आमदारांचीही नावे घेण्यात आली आहे. मला वाटतं यात खुलासा होऊन जाऊ द्या. असं प्रतिआव्हान त्यांनी आपल्या विरोधकांना दिलं आहे. या प्रकरणात महाजन यांच्याकडेही संशयाची सुई नेली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा खूलासा केला आहे. 

 Mumbai Local Train Blast: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण! सर्व 11 आरोपींची निर्दोष मुक्तता, 209 जणांनी गमावलेला जीव

महाजन पुढे म्हणाले की या कथीत हनीट्रॅपच्या सर्व गोष्टी समोर यायला पाहीजे.  त्याबाबतची सीडी आणि रेकॉर्डिंग असल्याचं सांगितलं जात आहे. मग ते सर्वां समोर यायला पाहीजे. ते बघायला ही हवे असं ही ते म्हणेल. याबाबत वेगवेगळे आरोप होत आहेत. मला सगळ्या लोकांकडून याबाबत ऐकायला मिळत आहे. संबंधीत हॉटेलमधील व्यक्ती अधिकाऱ्याना बोलावतो, समाजातील चांगल्या लोकांना बोलावतो, जेवू खाऊ घालतो आणि वेगळे धंदे करतो. असं ही ते म्हणाले.  

Advertisement

Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड

दरम्यान त्याच्याकडे काय क्लिप आहेत त्याही बघाव्या. त्या कोणी काढल्या आहेत ते पण बघावं.  माझे खुले आव्हान आहे असं ही त्यांनी सांगितलं.  लोढा आणि हे प्रकरण एकमेकांशी जोडू नये. जे असेल ते समोर येऊ द्यावे. महाराष्ट्रात कुठे काही झाले की खडसेंना माझं नाव सुचतं असं ही ते याबाबत म्हणाले. हनीट्रॅप प्रकरणाचे धागेदोरे अगदी जळगावपर्यंत पोहोचल्याचे बोलले जात आहे. त्यात प्रफुल्ल लोढा याला अटक झाली आहे. त्यानंतर भाजपचा एक मंत्री अडचणीत येणार असं बोललं जात होतं. त्यानंतर आता गिरीष महाजन हे पुढे आले आहेत. हनीट्रॅप बाबतचे पुरावे द्या नाहीतर राजकारण सोडेन असं ही ते म्हणाले आहेत. 

Advertisement