
Saiyaara Box Office Collection Day 1: 18 जुलै 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या अहान पांडेच्या 'सैयारा' या पदार्पणाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ₹21.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. ज्यामुळे हा चित्रपट कोणत्याही स्टार किडच्या पदार्पणातील आजपर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे. यशराज फिल्म्स निर्मित आणि मोहित सूरी दिग्दर्शित या म्युझिकल-रोमँटिक ड्रामामध्ये अहान पांडेसोबत अदिती पड्डा मुख्य भूमिकेत आहे.
चित्रपटाची कथा कृष कपूर (अहान) आणि गीतकार सिया (अदिती) यांची आहे. ज्यांची भेट म्यूझिकमुळे होते. नंतर पुढे त्यांच्यात प्रेम होते. पण एका अपघातामुळे सर्व काही बदलते. ज्यामुळे सिया तिचे जुने आयुष्य विसरते.'सैयारा'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली सुरुवात केली नाही, तर त्याला सोशल मीडिया आणि प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांनी चित्रपटाचे संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि अहान-अदितीच्या केमिस्ट्रीचे भरभरून कौतुक केले आहे.
नक्की वाचा - Shahrukh Khan: अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना, असं काय घडलं?
विशेष बाब म्हणजे, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही मोठ्या मार्केटिंगची किंवा मुलाखतींचा आधार घेण्यात आला नव्हता. तरीही चित्रपटाने 'कहो ना प्यार है', 'रिफ्यूजी' यांसारख्या पदार्पणाच्या चित्रपटांना ओपनिंग कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. 'सैयारा' हा केवळ अहान पांडेसाठी एक दमदार पदार्पण ठरला नाही, तर मोहित सूरीच्या कारकिर्दीतीलही हा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला आहे.
नक्की वाचा: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, लेकीने मदत मागितली पण...
सैयाराने पहिल्या दिवशीच 7 विक्रम रचले!
अहान पांडेच्या 'सैयारा' या पदार्पणाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कमाई करत सात मोठे विक्रम नोंदवले आहेत. हे विक्रम खालीलप्रमाणे.
1. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील कोणत्याही नवोदित अभिनेत्याच्या चित्रपटासाठी आजपर्यंतचे सर्वात मोठे ओपनिंग डे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन.
2. भारतीय सिनेमातील कोणत्याही 'प्रेमकथेने'ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई .
3. 2000 सालानंतर कोणत्याही नवोदित अभिनेत्याच्या चित्रपटासाठी ओपनिंग डेला सर्वाधिक तिकिटांची विक्री.
4. 'कहो ना प्यार है' आणि 'रिफ्यूजी' नंतर 25 वर्षांत कोणत्याही नवोदित अभिनेत्याच्या चित्रपटासाठी पहिल्या दिवशी सर्वाधिक तिकिटे विकली गेली.
5. 'सैयारा' हा मोहित सूरीच्या चित्रपट कारकिर्दीतील आजपर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट ठरला.
6. कोविड-19 नंतर प्रदर्शित झालेल्या 'लव्ह-स्टोरी' चित्रपटांमध्ये सर्वात मोठी ओपनिंग.
7. कोविड-19 नंतर एकाच दिवसात 20 कोटींचे निव्वळ कलेक्शन पार करणारी ही पहिली 'लव्ह-स्टोरी' फिल्म.
या विक्रमांमुळे 'सैयारा'ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त सुरुवात केली असून, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world