जाहिरात

Gogawale vs Rane: 'भरत गोगावलेंचा बंदोबस्त करू', 'त्या' वक्तव्यावरून महायुतीत वाद पेटणार?

नारायण राणे हे राज्याचे नेते आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. भारतीय जनता पार्टीचे ते एक भूषण आहेत, असं ही सावंत म्हणाले.

Gogawale vs Rane: 'भरत गोगावलेंचा बंदोबस्त करू', 'त्या' वक्तव्यावरून महायुतीत वाद पेटणार?
सिंधुदुर्ग:

नारायण राणे हे असेच मोठे झाले नाहीत. त्यांनी अंगावर केसेस घेतल्या. मर्डर ही केले असे वादग्रस्त वक्तव्य भरत गोगावले यांनी केले. या विरोधात मंत्री आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे वगळता कुणीही राणेंच्या बाजूने प्रतिक्रीया दिली नाही. गोगावलेंच्या ज्ञानात भर टाकेन असं नितेश राणे म्हणाले. शिवाय मर्डरचा कोणताही गुन्हा नारायण राणे यांच्या विरोधात नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं होते.  एकीकडे विरोधक या प्रकरणी राणेंना घेरत असताना दुसरीकडे राणेंच्या बाजूने त्यांच्या पक्षातील नेते काहीच बोलत नव्हते. त्यानंतर आता उशिराने सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्षांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. त्यांनी आम्ही गोगावलेंचा बंदोबस्त करू अशी प्रतिक्रीय दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भरत गोगावले यांनी जे काही वक्तव्य केलं आहे त्याची त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. महायुतीतले मंत्री भरत भोगावले यांनी खासदार नारायण राणे यांच्या बद्दल केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे असल्याचं ते म्हणाले. ऐवढ्या उशीरा प्रतिक्रीया का दिली यावर ही सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.  मी मुद्दाम सकाळपासून या विषयावर प्रतिक्रिया दिली नव्हती. आमचे सगळे कार्यकर्ते भरत गोगावले सारख्या एका नेत्याचे बंदोबस्त करायला तयार आहेत, असं ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Monsoon session: ठाकरे बंधूंच्या मोर्चाचा धसका? हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर महायुती सरकारकडून रद्द

नारायण राणे हे राज्याचे नेते आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. भारतीय जनता पार्टीचे ते एक भूषण आहेत. असं सावंत म्हणाले. पण नारायण राणे यांनी ज्या लोकांना घडवलं त्यांच्याच समोर गोगावले यांनी हे वक्तव्य करण हे आपल्याला आश्चर्याचे वाटले. त्यावेळी व्यासपीठावर उदय सामंत, दीपक केसरकर, आमदार निलेश राणे ही होते. असं असताना त्यांच्या समोर भरत गोगावले यांनी हे बोलण्याचे धारीष्ट केलं हे  क्लेशदायक आहे असं ही ते यावेळी म्हणाले. या पुढच्या काळात या भरत गोगावलेंचा आम्ही बंदोबस्त करू असा इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray: 'ही भीती असली पाहीजे', हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरेंचे सुचक वक्तव्य

भरत गोगावले यांनी स्थानिक कंपन्यामधून मोठा भ्रष्टाचार केला आहेत. त्यातूनच ते आमदार, मंत्री झाले आहेत. त्याबाबत आपल्याला अधिक बोलायला लावू नये असं ही सावंत यावेळी म्हणाले. गोगावले जे काही बोलले आहेत त्याची वरिष्ठ पातळीवर नक्कीच दखल घेतली जाईल. पण गोगावले यांनी वेळीच माफी मागावी असं ही ते म्हणाले. यापुढे त्यांनी सिंधुदुर्गात येवून असं वक्तव्य करू नयेत असं ही त्यांनी सांगितले. ते जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत महायुतीला जिल्ह्यातील कोणताही निर्णय होणार नाही असं ही ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com