गुजरात काँग्रेसमध्ये काही नेते ही भाजपसाठी काम करत आहेत. अशा लोकांना मग ते कितीही असले तरी त्यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. भाजपने तर यावरून राहुल गांधींना लक्ष्य करत त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. त्यात आता काँग्रेसचे जेष्ट नेते अहमद पटेल यांची कन्या मुमताज पटेल यांनी याबाबत आता मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे येत्या काळात गुजरात काँग्रेसमध्ये मोठ्या खळबळ उडण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहमद पटेल हयात असताना त्यांचा काँग्रेसमध्ये दबदबा होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी मुमताज पटेल यांना पक्षाने कुठेही संधी दिली नाही. त्यामुळे त्या गुजरात ऐवजी अधिक काळ दिल्लीतच असतात. मात्र राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुमताज या व्यक्त झाल्या आहेत. त्या म्हणाल्या मला पक्षाने आतापर्यंत कुठलेही पद दिले नाही. प्रदेश कमिटीमध्ये ही स्थान दिले नाही. संघटनेत आपल्याला कोणताच रोली देण्यात आला नव्हता. त्यामुळे आपल्याला दिल्लीत रहावे लागले.
राहुल गांधी यांनी जे काही नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचे वक्तव्य केले आहे त्यामुळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना हिंम्मत मिळाली आहे असंही त्या म्हणाल्या. पक्षात असे अनेक नेते आहेत जे कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखत आहेत. त्यात त्यांचा स्वार्थ असतो. त्यामुळेच पक्ष कमजोर झाला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आता ग्राऊड लेवलची स्थिती काय आहे हे लक्षात आले असेल असं त्या म्हणाल्या.
राहुल गांधी आज बोलले त्यामुळे आपली बोलण्याची हिंम्मत झाली असंही मुमताज म्हणाल्या. आम्ही पण पक्षात आहोत. पक्षासाठी आम्हाला ही काम करायचे आहे. पण संधी दिली जात नाही. पक्षातले बरेच लोक आहे जे भाजपसाठी काम करतात. गेल्या 30 वर्षात पक्षाला सत्ता मिळवता आली नाही. त्यावरून ते कसे काम करत आहेत हे समजत आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा बदल गुजरात काँग्रेसमध्ये होईल अशी अपेक्षा आहे असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस महिलांना मोठी संधी देईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. आधी राहुल गांधींपर्यंत योग्य फिडबॅक जात नव्हता. त्यामुळे कारवाई होत नव्हती असंही त्या म्हणाल्या.