
मागील लोकसभा निवडणुकीत (Loksabha Elections 2024) काँग्रेसला सत्ता मिळाली नसली तरी त्यांच्या जागांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली होती. लोकसभा निवडणुकीतील यशाचं सातत्य पक्षाला पुढं राखता आलं नाही. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर पक्षाला खातंही उघडता आलं नव्हतं.
काँग्रेसची अनेक राज्यात बिकट अवस्था आहे. त्यामध्ये गुजरातचा समावेश आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळ काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुजरात काँग्रेसमधील काही नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुजरात काँग्रेसमधील काही नेते भाजपासाठी गुप्तपणे काम करत आहेत, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय. भाजपा शासित राज्यात पक्षाला मजबूत करण्यासाठी गरज पडली तर 30-40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यास तयार आहोत, असं राहुल यांनी स्पष्ट केलं. ते अहमदाबादमध्ये बोलत होते.
राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितलं की, 'आपल्याला गुजरातमधील लोकांशी कनेक्ट व्हायचचं असेल तर दोन कामं करावी लागतील. पहिलं काम म्हणजे निष्ठावंत आणि बंडखोरांचे ग्रुप वेगळे करावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला 10, 15, 20, 30, 40 लोकांना काढावं लागलं तर आम्ही तसं करायला तयार आहोत.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी सांगितलं की, 'काँग्रेसमधील जे लोक गुप्तपणे भाजपासाठी काम करत आहेत, त्यांनी पुढं यावं. भाजपासाठी उघडपणे काम करावं. भाजपामध्ये या लोकांना जागा आहे की नाही हे पाहावं. ते तुम्हाला बाहेर काढतील.'
गेल्या तीन दशकांमध्ये गुजरातच्या नागरिकांची अपेक्षा पूर्ण करण्यात काँग्रेस असमर्थ ठरली हे राहुल यांनी मान्य केलं. काँग्रेसच्या काही जणांचा भाजपासोबत असलेली गुप्त तडजोड हे याचं कारण असल्याचं त्यांनी सांगितलं.
पक्षाच्या विरोधात असलेल्या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला तरच लोक काँग्रेसवर विश्वास ठेवतील असं राहुल यांनी यावेळी ठासून सांगितलं. गुजरातच्या लोकांसोबत नातं बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये लपलेल्या बंडखोरांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असल्याचं राहुल यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world