गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री! आदित्य ठाकरेंविरोधात लढणार निवडणूक

एसटी कामगारांचे नेते, मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

एसटी कामगारांचे नेते, मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. मुंबईतील प्रतिष्ठेच्या वरळी मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. सदावर्ते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांनी त्यासाठी महायुतीकडं तिकीटही मागितलं आहे.महायुतीशी बोलणं झालं असून त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे सध्या आमदार आहेत. मराठी मतदारांचं बाहुल्य असलेल्या या मतदारसंघात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे विजयी झाले होेते. त्यांच्या दिमतीला दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. ते याच मतदार संघात आहेत. शिवाय माजी महापौरही याच मतदार संघात राहातात. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी ही सेफ जागा समजली जाते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांना निसटती आघाडी मिळाली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या काही महिन्यांपासून वरळी मतदार संघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी तशी तयारीही सुरु केलीय. त्याचबरोबर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नावाचीही वरळीमध्ये चर्चा आहे. त्यातच सदावर्ते यांचीही एन्ट्री झाल्यानं वरळीतील लढत लक्षवेधी होणार आहे.   

( नक्की वाचा : राज ठाकरेंचा आदित्य विरोधातील उमेदवार ठरला! संदीप देशपांडेंचं कौतुक करताना म्हणाले... )

बिग बॉसमध्ये एन्ट्री

सलमान खान होस्ट असलेल्या रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस (हिंदी) मध्येही एन्ट्री करणार आहेत. येत्या 6 ऑक्टोबरपासून हा शो सुरु होणार आहे. सदावर्तेमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article