अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? तो आमदार कोण?

विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकतीच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले. तर आज अजितदादांचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या जवळ दिसले.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

विधानसभा निवडणुका जस-जशा जवळ येत आहेत तस- तशा राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. अनेक इच्छुक हे चाचपणी करत आहेत. काही जण पक्ष बदलण्याच्या मनस्थितीत आहेत. थांबा आणि पाहा अशी भूमिकाही काही जणांनी घेतली आहे. त्यात अजित पवारांना मात्र एकामागून एक धक्के लागत आहेत. विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकतीच अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांना साथ देण्याचे ठरवले. तर आज अजितदादांचे आणखी एक आमदार शरद पवारांच्या जवळ दिसले. पुण्यात शरद पवारांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दादांचा आमदार शरद पवारांच्या बाजूलाच बसलेला दिसला. पवारांच्या कार्यक्रमाला या आमदाराच्या उपस्थितीने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने, गोल्डन जुलै कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहूणे होते. हा कार्यक्रम हडपसर मतदार संघातील वानवडी येथे होता. हडपसरमध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत. सध्या ते अजित पवार गटात आहेत. चेतन तुपे हे अजित पवारांचे जवळचे मानले जातात. या कार्यक्रमाला चेतन तुपे यांनी उपस्थितीत लावली. ते शरद पवारांच्या बाजूलाही बसले होते. यावेळी दोघांमध्येही चर्चा झाली. त्यामुळे या दोघांत राजकीय चर्चा झाली का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसां पूर्वी शरद पवारांनी आमदार अतूल बेनके यांचीही भेट घेतली होती. बेनकेही सध्या अजित पवार गटात आहेत.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं   

दरम्यान सातारा जिल्हा मित्र मंडळाचा हा कार्यक्रम होता. मतदार संघात कार्यक्रम असल्याने आमदार म्हणून आपल्याला निमंत्रण होते. शिवाय या कार्यक्रमाचे आयोजक हे आपले मित्र आहेत. शिवाय हा अराजकीय कार्यक्रम होता. त्यामुळे आपण इथे उपस्थित होतो असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये असेही ते म्हणाले.  या कार्यक्रमात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असेही ते म्हणाले.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  हाडं तोडली, प्रायव्हेट पार्टवर जखमा, चेहऱ्याचा चेंदामेंदा; उरणमधील यशश्रीविरोधात इतकी क्रूरता का आली?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात काही आमदार असल्याचेही बोलले जात आहे. नुकताच परभणीच्या बाबाजानी दुर्राणी यांनीही अजित पवारांचा पक्ष सोडून शरद पवारांकडे पुन्हा आले आहेत. शरद पवारांना सोडून जाणारे पुढे शुन्य होतात, आपण शुन्य होण्या आधी शरद पवारांकडे परतलो आहोत, असेही ते यावेळी म्हणाले होते. पवारांना आपण का सोडले असा प्रश्नही त्यांनी स्वत:लाच केला. दुर्राणी यांनी प्रवेश केल्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेही शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ हे अलिकडेच झालेल्या शरद पवारांच्या कार्यक्रमात दिसून आले होते. ते शरद पवार गटाकडून दिंडोरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत.  

Advertisement

Topics mentioned in this article