'मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री झाले असते,' शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं कारण

सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी

सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) हे त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पराभूत झाले. पण, या निवडणुकीत मी विजयी झालो असतो तर एकनाथ शिंदे नक्की मुख्यमंत्री झाले असते, असा दावा त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले शहाजीबापू?

शहाजीबापू यावेळी बोलताना म्हणाले की, 'मी 1995 ला निवडून आलो, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2019 मध्ये निवडून आलो तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अडीच वर्षांनी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी उठाव केला आणि ते मुख्यमंत्री झाले. माझी रास शिवसेनेची आहे. मी कसा काँग्रेसमध्ये गेलो मला माहिती नाही.' पाटील यांनी विनोदी शैलीत सांगितलेल्या या कारणाची सध्या चर्चा होत आहे.  

2024 च्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू यांचा 25,386 मतांनी पराभव झाला होता. शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं बहुमत मिळालं. पण, शिवसेनेपेक्षा भाजपाचे आमदार जास्त निवडून आल्यानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले. 

( नक्की वाचा : Caste census : जातीनिहाय जनगणना म्हणजे काय? ती घेण्याची वेळ का आली? वाचा सर्व प्रश्नांची उत्तर )
 

भरसभेत मारुन घेतली होती थोबाडीत

दरम्यान शहाजीबापू पाटील यापूर्वी भर सभेत स्वत:ला थोबाडीत मारुन घेतल्यानं चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिले नाही. पाणी आडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवले. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे. याबद्दल माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःला थोबाडीत मारून घेतली होती.

Advertisement
Topics mentioned in this article