इंदापूरात महायुतीत फुट? पाटील विरुद्ध भरणे बॅनरवॉर रंगले, एकमेकांना डिवचले

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर जोरदार सुरू आहे. त्यामुळे इंदापूर जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांची असणार हे निश्चित आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

देवा राखुंडे 

लोकसभा निवडणुकीनंतर आता सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. कोणाच्या वाट्याला कोणता मतदार संघ जाणार हे अजून जरी गुलदस्त्यात असले तरी कार्यकर्ते मात्र जोमात आहेत. त्याचीच प्रचिती बारामती लोकसभेतील इंदापूर विधानसभा मतदार संघात येत आहेत. या मतदार संघात महायुतीतल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या बॅनर वॉर जोरदार सुरू आहे. त्यामुळे या जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांची असणार हे निश्चित आहे. या जागेवर भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबरच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनी दावा केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

'आमचं आता ठरलं, लागा तयारीला'    

विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांना होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यंनी आपल्या पारंपारीक इंदापूर विधानसभेव लक्ष केंद्रीत केले आहे. पाटील यांचे कार्यकर्तेही जोरात आहेत. महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे अजूनही निश्चित नाही. त्या आधीच हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे कामाला लागले आहे. त्यांनी इंदापूरमध्ये जोरदार बॅनरबाजी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात "आमचा स्वाभिमान आमचे विमान" "आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा 2024" अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावले आहेत. त्यातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर अपक्ष लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - जरांगेंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवल्याचा आरोप, विशेष पथक करणार प्रकरणाची चौकशी

'आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं'

हर्षवर्धन पाटलांच्या या बॅनरबाजीला उत्तर देणार नाहीत ते दत्ता भरणे कसले. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मग इंदापूरात बॅनर झळकवले आहेत. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनर शेजारीच दत्ता मामांचे बॅनर लावण्यात आले. "विकासाची परंपरा कायम राखुया, चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया. शिवाय 'आमचं ठरत नसतं, तर आमचं फिक्स असतं' असं प्रत्युत्तरही भरणेंच्या समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून दिलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वसंत मोरेंचं ठरलं! इंजिन सोडलं, रोड रोलरवर चढले,आता हाती मशाल घेणार

हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय प्रवास 

हर्षवर्धन पाटील यांनी 1995 साली राजकारणात एन्ट्री केली होती. काँग्रेसने त्यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्यांनी इंदापुरातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. हर्षवर्धन पाटील यांचे चुलते स्वर्गीय खासदार शंकरराव पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांना अपक्ष उभं केलं. त्यावेळी भिंतीवरील घड्याळ हे चिन्ह त्यांना मिळालं होतं. त्या निवडणुकीत पाटीलांनी विजय मिळवला. शिवाय राज्यात सत्ता बदल झाला. हर्षवर्धन पाटील यांनी युती सरकारला पाठींबा दिला. अपक्षांची मोट बांधली आणि त्याचे नेतृत्व स्वत:कडे घेतले. त्यांना त्या बदल्यात राज्यमंत्रीपद देण्यात आले. 1999 लाही ते अपक्ष म्हणून निवडणूक लढले आणि विजयी झाले. त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह विमान होते.  यावेळी त्यांनी युती ऐवजी आघाडीला पाठींबा दिला. ते विलासरावांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री झाले. मात्र पुढे त्यांना अजित पवारांमुळे राजीनामा द्यावा लागला होता. पण पुढे त्यांना विलासरावांनी बढती देत कॅबिनेट मंत्री केले होते. 2004 ची निवडणूकही ते जिंकले. मात्र 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांच्या पदरात पराभव पडवला. राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे यांनी त्यांचा लागोपाठ दोन वेळा पराभव केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - उच्च न्यायालयाने सुनील केदार यांची याचिका फेटाळली, राजकीय भवितव्य टांगणीला!

इंदापूरची जागा राष्ट्रवादीचीच 
 

2019 साली हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचं कारणचं होतं ते म्हणजे इंदापूरची विधानसभेची जागा. 2019 ला भले आघाडी तुटली तरी बेहत्तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही, अशी गर्जनाच अजित पवारांनी केली होती.आता हेच अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने इंदापूरच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पुन्हा इंदापूरच्या जागेवर अजित पवार अडून बसतील आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल असे संकेत कार्यकर्त्यांना मिळू लागल्याने पाटील यांनी आतापासूनच अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरु केल्याचं दिसून येतयं.