जाहिरात

Ind vs Pak Match: 'पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नकोच' इस्लाम पार्टीचे वक्तव्य चर्चेत, कारण ही सांगितले

इस्लाम पार्टीने भारत पाकिस्तान मॅचला विरोध केला आहे.

Ind vs Pak Match: 'पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नकोच' इस्लाम पार्टीचे वक्तव्य चर्चेत, कारण ही सांगितले
  • भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी २० विश्वचषकाचा सामना कोलंबो येथे मोठ्या उत्साहात पार पडत आहे
  • इस्लाम पार्टीने भारत-पाकिस्तान सामना खेळण्यावर स्पष्ट विरोध व्यक्त केला आहे
  • इस्लाम पार्टीचे म्हणणे आहे की पाकिस्तान वारंवार दहशतवादी कारवाया करत आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मालेगाव:

निलेश वाघ

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज टी 20 विश्वचषकातील सामना कोलंबो इथं खेळला जात आहे. या सामन्याकडे जगाचे लक्ष लागले आहेत. हा सामना पाहाण्यासाठी दोन्ही देशाचे क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने श्रीलंकेत दाखल झाले आहेत. एकीकडे हा सामना व्हावा असं क्रिकेटप्रेंमीना वाटत आहे. तर दुसरीकडे या सामन्याला विरोध होताना ही दिसत आहे. भारताने पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये अशी भूमीका इस्लाम पार्टीने घेतली आहे. मालेगावमध्ये स्थापन झालेल्या या पार्टीने आपली भूमीका मांडली आहे. इस्लाम पार्टीने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत मालेगावमध्ये सत्ता स्थापन केली आहे. 

नक्की वाचा - IND vs PAK: 'तो' 10 ओव्हर खेळला तर सामना संपलाच समजा' 'या' खेळाडूची शोएब अख्तरलाही धडकी

इस्लाम पार्टीने भारत पाकिस्तान मॅचला विरोध केला आहे. भारताने पाकिस्तान सोबत समाना का खेळू नये याची कारणे ही त्यांनी दिली आहेत. पाकिस्तान  आपल्या देशावर वारंवार हल्ले करत आहे.  देशात दहशतवादी कारवाया करत आहे. अश्या स्थितीत त्यांच्याशी क्रिकेट सामना खेळलाच नाही पाहिजे अशी स्पष्ट भूमीका त्यांनी घेतली आहे. भाजपने  जीव दिला पाहिजे असं ही पक्षाने म्हटलं आहे. आयपीएल व क्रिकेट सामन्याच्या माध्यमातून करोडो रुपयांचा व्यवसाय सुरू आहे. खेळाच्या माध्यमातून कोट्यवधी कमावले जात आहेत असा आरोप त्यांनी केला.  

नक्की वाचा - IND vs PAK LIVE: भारत-पाकिस्तानचा संघ स्टेडियमबाहेर दाखल, कोण कोण खेळाडू पोहोचले? व्हिडीओ आला समोर

त्यांना देशप्रेम वगैरे याच्याशी काही देणे-घेणे नाही असे परखड मत इस्लाम पार्टीचे संस्थापक माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केले आहे. भारताने पाकिस्तान सोबत कोणताही क्रिकेट सामना खेळू नये असे आवाहन ही त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. शिवसेना ठाकरे गटाने ही भारत पाक सामन्याबाबत विरोध दर्शवला होता. पण असं असलं तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी ठरणार हे निश्चित आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com