INDIA आघाडीचे टाटा, बाय-बाय! शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय?

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  (Delhi Elections 2025) प्रचारामुळे राजकारण तापलेले असतानाच विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या अस्तित्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  (Delhi Elections 2025) प्रचारामुळे राजकारण तापलेले असतानाच विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीच्या अस्तित्वावर सातत्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. या आघडीचे नेतेच याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल, ओमर अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरे यांच्या यादीमध्ये आता शरद पवार यांचाही समावेश झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विरोधी पक्षांची INDIA आघाडी राष्ट्रीय निवडणुकांपुरतीच होती. विधानसभा निवडणुकांचा याचा काहीही संबंध नाही. राज्यातील निवडणुकांबाबत INDIA आघाडीत कधीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी मंगळवारी स्पष्ट केलं. 

मुंबईतील पत्रकर परिषदेमध्ये शरद पवार यांनी सांगितलं की, 'INDIA आघाडीमध्ये कधीही राज्य आणि स्थानिक निवडणुकांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुका म्हणजेच लोकसभा निवडणुकांसाठी ही आघाडी स्थापन झाली होती. आघाडीतील सर्व पक्ष स्थानिक निवडणुकांबाबतची भूमिका 10 दिवसांमध्ये स्पष्ट करतील, असं त्यांनी सांगितलं.  

( नक्की वाचा : Sharad Pawar vs Amit Shah : शरद पवार अमित शाहांना हिणवतात 'ते' प्रकरण काय आहे? )

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार NCP (SP) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये लढत होत आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सांगितलं, 'INDIA आघाडीचा उद्देश फक्त राष्ट्रीय निवडणुका होता. दिल्ली विधानसभा निवडणुका हा अरविंद केजरीवाल यांचा भाग आहे. दिल्लीतील मतदारांनी केजरीवाल यांच्या पक्षाला सलग दोनदा बहुमत दिलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विचारुन काही केलं असतं तर बरं झालं असतं.'

Advertisement

यापूर्वी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिक निवडणुका पक्ष स्वबळावर लढत असतात, असं सांगितलं. स्थानिक निवडणुका या पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांच्या असतात. ही निवडणूक देखील आघाडी एकत्र लढली तर स्थानिक केडर काय करणार? ते फक्त नेत्यांच्या सतरंजी उचलणार का? हा प्रश्न विचारला होता. 

Topics mentioned in this article