Jalna ZP: जालन्यात फुटीनंतर महायुतीची परीक्षा; आरक्षणानंतर कुणाला 'लॉटरी', कुणाला धक्का? वाचा सविस्तर

Jalna Zilla Parishad Election : जालन्यात लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसमोर (BJP) आपले गड राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Jalna ZP: जालना जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर झालं आहे.
जालना:

लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी

Jalna Zilla Parishad Election : राज्यात पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीचे (Zilha Parishad Election) बिगुल वाजले आहे. जालन्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी आरक्षण (Reservation) जाहीर झाले असून, यामध्ये 16 जागा ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी, 8 जागा महिलांसाठी (Women) तर अध्यक्षपद ओबीसी महिला (OBC Women) प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. या आरक्षणामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला असून, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपसमोर (BJP) आपले गड राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

जालना जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी जाहीर झालेले सविस्तर आरक्षण खालीलप्रमाणे आहे:

                                        
अनुसूचित जमाती महिला -   जळगांव सपकाळ
अनुसूचित जाती महिला -   राजुर, जावखेडा ठेग, सिपोरा अंभोरा, रेवगाव
अनुसूचित जाती पुरुष  -    बावनेपांगरी, शेलगाव, वाघरळ जहागीर, सेवली
ओबीसी महिला -  वालसावंगी, बालसा वडाळा, वरुड बुद्रुक माहोरा, गेवराई बाजार, देवामूती, पाटोदा माव, रोहिलागड
ओबीसी पुरुष -   पारध बु, आव्हाना, हसनाबाद, टेभूर्णी, अकोला देव, केधळी, जामखेड
सर्वसाधारण महिला-  आन्वा, सोयगावदेवी, चांदई ठोंबरी, दाभाडी, रोशनगाव, पीर कल्याण, रामनगर, पागरी गोसावी, सातोना खुर्द,                     आष्टी,  कोकाटे हदगाव, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, राजा टाकळी, पारनेर, धाकलगाव                  
सर्वसाधारण पुरुष -       नळणी बुद्रुक, मोजपुरी भाटेपुरी, तळणी, खोराड सावंगी, जयपूर, हेलस, वाटुर, राणी उंचेगाव, रांजणी, गुरु                         पिंपरी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, ताड हदगाव, साष्ट पिंपळगाव, गोंदी, शहागड

भाजपासमोर आव्हान

जालना जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व चांगलेच वाढवले आहे. 2012 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत अवघ्या 12 जागांवर विजयी झालेल्या भाजपने 2017 मध्ये मोठी झेप घेतली. 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल पाहिला तर 56 पैकी 22 जागांवर विजय मिळवून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. तर शिवसेनेने 14, राष्ट्रवादी काँग्रेसने 13, काँग्रेसने 5 आणि अपक्ष 2 सदस्य निवडून आले होते. 2024 मध्ये भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

यंदाच्या निवडणुकीत जालन्यातील भाजपचे पाच मातब्बर नेते आपले वर्चस्व राखून ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, सतीश घाटगे आणि नव्यानेच काँग्रेसमधून भाजपच्या ताफ्यात दाखल झालेले कैलास गोरंट्याल यांचा समावेश आहे. हे सर्व नेते जिल्हा परिषदेत भाजपला विजयी आघाडी मिळवून देण्यासाठी आपली ताकद पणाला लावतील.

( नक्की वाचा : Pune News : पुण्याच्या मॉर्डन कॉलेजमुळे मराठी तरुणानं लंडनमधील नोकरी गमावली? प्राचार्यांनी दिलं उत्तर )
 

ठाकरे गट आणि शरद पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई

राज्यात झालेल्या शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) (राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गट) फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे नव्याने मांडावी लागणार आहेत. ठाकरे गट (Shiv Sena - Uddhav Balasaheb Thackeray) आणि शरद पवार गटाला (NCP - Sharadchandra Pawar) जालन्यात आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याची ही लढाई असणार आहे. पक्षातील फुटीनंतर दोन्ही पक्ष जालन्यात राजकीय दृष्ट्या कमकुवत झाले आहेत.

Advertisement

शिवसेनेतील फुटीनंतर अर्जुन खोतकर आणि हिकमत उधाण यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाला (Shiv Sena - Eknath Shinde Group) मोठा विजय मिळवून देण्याची जबाबदारी या दोन नेत्यांवर असणार आहे. दोन्ही आमदार शिंदे गटाकडे असल्याने ठाकरे गटाला नव्याने पक्षबांधणी करावी लागणार आहे.

( नक्की वाचा : Thackeray Family Photo: ठाकरे घराण्याच्या वारसदारांनी दिली 'एकजुटी'ची साक्ष, फोटोची तुफान चर्चा... )
 

शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभवदेखील पक्षासाठी धक्कादायक होता. त्यामुळे राजेश टोपेंना पुन्हा एकदा जालन्यात आपले वर्चस्व सिद्ध करावे लागणार आहे. सोबतच चंद्रकांत दानवे आणि रावसाहेब दानवे यांच्यातला राजकीय संघर्ष या झेडपी निवडणुकीतही पाहायला मिळेल.

Advertisement

अजित पवार गटाला कमी वाव?
जालना झेडपी निवडणुकीत अजित पवार गटाला (NCP - Ajit Pawar Group) फारसा वाव मिळण्याची चिन्हे कमी आहेत. जालन्यात महायुतीने एकत्र निवडणूक लढल्यास, अजित पवारांचा प्रयत्न इथे कमी जागांवर तडजोड करून दुसऱ्या जिल्ह्यात जास्त जागा मिळवण्याचा असू शकतो.

एकूणच, जालन्यात भाजपसमोर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. परंतु, भाजप महायुतीसोबत लढणार की स्वबळावर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article