NDA मध्ये तणाव? जीतनराम मांझी म्हणाले 'या' जागांवर आम्हीच लढणार, कुणासमोर नाही झुकणार

हा कार्यक्रम भागलपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
पाटणा:

बिहारमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. निवडणुकीपूर्वी, राहुल गांधींनी एका बाजूला 'मतदार अधिकार रॅली' काढली, तर दुसऱ्या बाजूला एनडीएचे नेते त्यांच्या विजयाबद्दल बोलत आहेत. याच दरम्यान, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भागलपूर येथे 'हिंदुस्तानी आवाम मोर्चा'च्या कार्यकर्ता संमेलनाला संबोधित केले. त्यात त्यांनी काही झालं तरी 20 जागांवर आपला पक्ष निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. आम्ही कुणा समोर ही छुकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

हा कार्यक्रम भागलपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या संमेलनाचा मुख्य उद्देश पक्षाच्या कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे हा होता. हिंदुस्तानी आवाम मोर्चा या निवडणुकीत 20 जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची योजना आखत आहे. त्यामुळेच जीतन राम मांझी यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या एका दिवसाच्या भागलपूर दौऱ्यावर टाऊन हॉलमध्ये पोहोचलेल्या जीतन राम मांझी यांनी रेशीम उद्योगावर आपले विचार मांडले.

नक्की वाचा - मोठा पेच! मराठा समाजाला ‘सरसकट कुणबी' संबोधण्यास हायकोर्ट- सुप्रीम कोर्टाचा सपशेल नकार

ते म्हणाले की, सरकारच्या योजनांच्या माध्यमातून रेशीमचा एक क्लस्टर (समूह) तयार केला जाईल, ज्यामुळे या उद्योगात काम करणाऱ्या सर्व लोकांना फायदा होईल, कोणत्याही विशिष्ट समाजाला नाही. ते असेही म्हणाले की टेरिफचा वस्त्रोद्योगावर कोणताही परिणाम होणार नाही. पत्रकारांच्या प्रश्नावर मांझी म्हणाले की, त्यांचा पक्ष 20 जागांवर निवडणूक लढवण्याची योजना आखत आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केले की ते कुणासमोरही झुकणार नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, विरोधी पक्ष त्यांच्या समस्या स्वतः सोडवतील. आम्ही फक्त आमच्या योजनेवर लक्ष केंद्रित करत आहोत.