Avhad vs Rane: राजापूर वाद ते हलाल झटका! आव्हाड- राणेंमध्ये उडला विधानसभेत खटका

मात्र आपण कुणाचेही नाव घेतले नाही. शिवाय नियम आपल्याला माहित आहेत असं आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मत्सविकास मंत्री नितेश राणे यांना लक्ष्य केलं. त्यावेळी नितेश राणे हे सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र त्यांचे मोठे बंधू निलेश राणे हे विधानसभेत होते. त्यावेळी आव्हाड आणि राणे यांच्या जुंपली. मात्र आव्हाडांनी नियमावर बोट ठेवत आपलं भाषण सुरू ठेवलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राजापूरमध्ये झालेल्या वादा बाबत जितेंद्र आव्हाड बोलत होते. ज्या राजापूरचं प्रतिनिधीत्व नाथ पै यांनी केलं. ज्या राजापूरचं प्रतिनिधीत्व मधू दंडवते यांनी केलं. अशा राजापूरमध्ये कधीच हिंदू मुस्लीम वाद कुणी पाहीला नाही. असं आव्हाड म्हणाले. त्याच राजापूरमध्ये चार जणांना जावून दर्गा जाळला. याघटनेमुळे गावातले मुस्लीम घाबरले. त्याच वेळी गावातल्या हिंदूनी एकत्र येत आग विझवली. हे खरे हिंदू आहेत असंही ते म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रा जाळू नका असं म्हणत तुमच्यातला एक मंत्री आहे, त्याची काही जबाबदारी आहे की नाही? असा थेट सवाल त्यांनी केला. त्यांचा रोख नितेश राणे यांच्याकडे होता. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kunal Kamra:'चेहरे पे दाढी,आखो मे शोले', कुणाल कामराचं सोडा शिंदेंच्या सेनेची कविता एकदा ऐकाच

आव्हाडांचा हा हल्ला आमदार निलेश राणे यांच्या वर्मी लागला. त्यांनी आव्हाडांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला. एक मंत्री राजापूरमध्ये जे घडलं त्याला जबाबदार आहे असं आव्हाड कसं म्हणू शकतात. त्यांच्याकडे त्याबाबतचे काही पुरावे आहेत का? असा प्रश्न त्यांनी केला. शिवाय आव्हाड हे राजापूरचे नाहीत. त्या दिवशी तिथं काय झालं हे त्यांना माहित नाही. सर्व स्थिती ही पहिल्या मिनिटापासून नियंत्रणात होती असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. त्यामुळे मंत्र्यांना जबाबदार कसं धरता येईल असं त्यांनी सांगितलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Shivsena Rada: शिंदेंच्या उपशहर प्रमुखाला महिलेने कानफटवले, शिंदेंच्या सेनेत चाललंय काय?

मात्र आपण कुणाचेही नाव घेतले नाही. शिवाय नियम आपल्याला माहित आहेत असं आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. मंत्र्यांनी कसली शपथ घेतली आहे. ते फक्त कॅबिनेट पुरता मर्यादित आहेत का? त्यांच्यावर बाहेरची काही जबाबदारी नाही का? ते उठतात आणि बाहेर भडकवण्याचे काम करतात असा आरोपही यावेळी आव्हाड यांनी केला. शिवाय हलाल आणि झटका या मटणाचा विषय ही त्यांनी काढला. महाराष्ट्रात किती झटका मटणाची दुकानं आहेत हे सरकार सांगणार आहे का? असा प्रश्न ही त्यांनी केला. मी 365 दिवस चिकन मटण खातो असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. 

Advertisement