मुख्यमंत्री शिंदेंची जितेंद्र आव्हाडांनी घेतली भेट, ठाण्याच्या घरी चर्चा काय झाली?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड शिंदेंना भेटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांचे नाते सर्वश्रुत आहे. असं असताना सर्वांच्या भूवया उंचावतील अशी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड शिंदेंना भेटल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरीही गणपती बसलला जातो. त्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आव्हाड शिंदेच्या घरी गेल्याचे समजत आहे. यावेळी या दोन्ही नेत्यामध्ये चर्चाही झाली आहे. मात्र त्याचा तपशील बाहेर येवू शकलेला नाही. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातून आपल्या राजकारणाची सुरूवात केली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून राजकारणात होते. तर जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ठाण्यात राजकारण करत होते. दोन्ही नेते दोन टोकाच्या विचारसरणीचे. ठाण्यात या दोघांचाही तसा दबदबा आहे. या दोघांचा राजकीय विरोध तर टोकाचा आहे. एकनाथ शिंदे हे सध्या मुख्यमंत्री आहेत. तर जितेंद्र आव्हाडांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले आहे. आपल्या मतदार संघात ही हे दोघे मजबूत आहेत. त्यांचा जनाधारही मोठा आहे.    

ट्रेंडिंग बातमी - Bhumre Vs Khaire : गणपतीसमोर मान-अपमानाचं राजकारण, खैर-भुमरे स्टेजवरच भिडले

अशा वेळी जितेंद्र आव्हाडांनी शिंदेची भेट घेणे ते ही त्यांच्या घरी जावून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले जाते. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानीही गणपतीचे आगमन होते. वर्षा निवासस्थानी गणरायाची पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यात आले होते. त्यानंतर ठाण्याच्या घरातही गणपती बसवण्यात आला होता. त्याच्या दर्शनासाठी जितेंद्र आव्हाड गेले होते. आव्हाड तिथे दहा ते पंधरा मिनिटे थांबले होते. 

ट्रेंडिंग बातमी - 'लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले अन् तिकडे उधारी फिटली'

दरम्यान विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. आघाडी आणि युती यांच्यात चुरस असणार आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आतापासूनच झडायला लागल्या आहेत. त्यात जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर असतात. मात्र राजकीय वैर बाजूला ठेवून हे नेते गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.  

Advertisement