Suspension of MP: विरोधी पक्षातील 10 खासदार निलंबित, महाराष्ट्रातील एका खासदाराचा समावेश, काय घडलं?

यावेळी झालेल्या वादात मात्र थेट विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित खासदारांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत याचा ही समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

विरोधी पक्षाच्या 10 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. वक्फ दुरुस्ती विधेयका वर संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. या खासदारांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आलं आहे. यात महाराष्ट्रातील एका खासदाराचा समावेश आहे. संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल हे योग्य पद्धतीने काम करत नाहीत असा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला आहे. तर विरोधक या बैठकीत विरोधकांनी संसदे प्रमाणे गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला असं जगदंबिका पाल यांनी म्हटलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या सध्या बैठका सुरू आहेत. अनेक बैठकांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी खासदार यांच्यात वाद झाल्याच्या घटना या आधीही झाल्या आहेत. यावेळी झालेल्या वादात मात्र थेट विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबित खासदारांमध्ये महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत याचा ही समावेश आहे. समितीचे काम हुकुमशाह प्रमाणे चालवले जात असल्याचा आरोप यावेळी सावंत यांनी केला आहे. इतकं महत्वाचं विधेयक असून तेवढ्या गांभिर्याने सत्ताधारी ते घेत नाहीत असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Amit Shah: 'फक्त नेता होऊन भागत नाही, जमिनीवर काम करावं लागतं' पवारांना शहांनी पुन्हा डिवचलं

सावंत यांच्या प्रमाणे तृणमुल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम अब्दुल्ला, नदीमुल हक आणि इम्रान मसूद यांना निलंबित करण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं असल्याचा आरोप त्यांनी  केला आहे. जगदंबिका पाल  "जमीनदारी" प्रमाणे कामकाज चालवतात असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Pipmri Chinchwad Crime: 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रीलस्टार मैत्रिणीच्या 3 मित्रांना अटक

तर जेपीसीचे अध्यक्ष जगदंबिका पाल म्हणाले की, बैठकीदरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेप्रमाणे गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे होते असंही ते म्हणाले. त्या शिवाय विरोधी खासदार वेगवेगळे आवाज काढण्यासोबतच अश्लील शब्दांचाही वापर करत होते असा आरोप खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणला असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 10 खासदारांना निलंबित करण्यात आले असं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement