K. Kavitha: KCR यांचा लेकीलाच 'झटका'; के. कविता यांची BRS मधून हकालपट्टी

K Chandrashekar Rao Suspends Daughter K Kavitha from BRS : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या कन्या के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
K. Kavitha: शेजारच्या तेलंगणा राज्यात राजकीय भूंकप झाला आहे.
मुंबई:

K Chandrashekar Rao Suspends Daughter K Kavitha from BRS : तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती (BRS) पक्षाचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या कन्या के. कविता यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया आणि पक्षाची बदनामी केल्याच्या आरोपावरून त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राजकीय वर्तुळातून समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून के. चंद्रशेखर राव यांच्या कुटुंबात आणि पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह सुरू होता.

का झाली कारवाई?

बीआरएसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषद सदस्य असलेल्या के. कविता यांच्या अलीकडच्या वर्तनामुळे आणि त्यांच्या सततच्या पक्षविरोधी कारवायांमुळे पक्षाला मोठे नुकसान होत होते. त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. या कारणामुळेच पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी हा कठोर निर्णय घेतला.

( नक्की वाचा : 'माझी आई या जगात नाही, तरी तिला...' काँग्रेसच्या सभेत आईचा अपमान झाल्यानं PM मोदी भावुक )
 

के. कविता यांचे गंभीर आरोप

या कारवाईपूर्वी के. कविता यांनी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि त्यांचे सख्खे भाऊ केटी रामाराव (KTR) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. केटीआर हे पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याची तयारी करत असल्याचा त्यांचा दावा होता.

Advertisement

पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता त्यांनी आधीच वर्तवली होती. काही दिवसांपूर्वी बीआरएसच्या महिला आघाडीच्या प्रमुख असताना त्या प्रत्येक व्यासपीठावरून, आपल्याला पक्षातून काढण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप कविता करत होत्या.

Topics mentioned in this article