Kalyan News: शिंदे सेनेनं फक्त 6 तासात व्याजासह भाजपचा हिशोब केला चुकता, दिला मोठा धक्का

शिवाय निधी दिला जात नव्हता. विकास कामे रखडली होती. माजी नाराजी भाजपवर नाही असे ही ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान

कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात शिवसेना आणि भाजपच्या कुरघोडीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुती असल्याचं सांगत दोन्ही पक्षांनी मात्र एकमेकांनाच धक्के देण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिवसेना शिंदे गटाचे पाच पदाधिकारी आणि दोन माजी नगरसेवक भाजपमध्ये घेतले. त्याच्या सहा तासाच्या आतच शिवसेना शिंदे गटाने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याची पत्नी कविता मात्रे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश  झाला. त्यामुळे  कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात नाराजी नाट्य सुरु झाले आहे . मनसेनेही या दोन्ही पक्षाच्या कुरघोडीवर जोरदार टीका केली आहे. यामुळे कल्याण डोंबिवलीचे राजकीय वातावरण मात्र तापले आहे. 

डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र सर्वाचे लक्ष लागले होते की, या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे लोक येतील का आणि तसेच झाले. शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवलीत पाच पदाधिकारी, कल्याणचा एक पदाधिकारी आणि एक माजी नगरसेवक यांना देखील प्रवेश दिला गेला. अंबरनाथमधील शिवसेना शिंदे गटाच्या एका नगरसेवकाला भाजपतमध्ये आधीच घेतले आहे. 

नक्की वाचा - Dombivli News: 'तुम्ही प्रदेशाध्यक्ष, तुम्हीच युती धर्म पाळत नाही' निवडणुकी आधीच महायुतीत जूंपली

भाजपने शिवसेना शिंदे गटाला धक्का दिल्यानंतर सहा तासाच्या आत शिवसेना शिंदे  गटाने राजकीय खेळी केली.  भाजपचे दोन माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे याना आपल्या पक्षात घेतले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  खासदार श्रीकांत शिदे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. त्याच बरोबर शिवसेना ठाकरे गटाचे साईनाथ तारे यांना देखील शिवेसना शिंदे गटात  प्रवेश दिला गेला.  याबबत विकास म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, वारंवार मागणी करुन देखील आमच्या प्रभागात विकास कामांना प्राधान्य दिले जात नव्हते. 

नक्की वाचा - जगातील सर्वात महागडा तांदूळ, किंमत 12 हजार 500 रूपये प्रति किलो, कुठे मिळतो माहित आहे का?

शिवाय निधी दिला जात नव्हता. विकास कामे रखडली होती. माजी नाराजी भाजपवर नाही. माजी नाराजी येथील नेतृत्वावर होती. विकास कामांकरीता शिवसेना शिंदे गटात गेलो आहे. मात्र ज्या प्रकारे  शिवसेना भाजप पक्षाने एकमेकांचे पदाधिकारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे केडीएमसीचे  राजकारण तापले आहे. मनसेचे नेते  राजू पाटील यांनी शिवसेना भाजपमध्ये सुरु असलेल्या राजकीय कुरघोडीवर दोन्ही पक्षाला टोला लगावला आहे. भ्रष्टाचार आणि शहरातील दूरावस्था यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे राजकीय खेळ सुरु आहेत. आत्ता लोकांनी विचार केला पाहिजे . त्याना स्वार्थी लोक पाहिजेत की, चांगले प्रशासन चालवणारा राजकारणी  सारथी पाहिजे.

Advertisement