जाहिरात

भाजपाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी? सिद्धारमैयांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात आता काय घडणार?

Karnataka CM News : कर्नाटकच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

भाजपाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसची मोठी खेळी? सिद्धारमैयांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकात आता काय घडणार?
Karnataka CM News : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई:

Karnataka CM News : कर्नाटकच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्षाचा पेच अखेर सुटला आहे. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यामुळे दक्षिण भारतातील या महत्त्वाच्या राज्यात मोठ्या राजकीय बदलाचा मार्ग मोकळा झालाय.  . या निर्णयामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला पूर्णविराम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सिद्धारमैया यांनी आज सकाळी आपल्या निवासस्थानी एक महत्त्वाची ब्रेकफास्ट मीटिंग बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व प्रमुख मंत्री उपस्थित होते. इडली, चटणी, वडा आणि केसरी भात अशा दाक्षिणात्य मेजवानीवर सर्वांनी एकत्र ताव मारला. नाश्त्यानंतर झालेल्या चर्चेत सिद्धारमैया यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होत असल्याचे जाहीर केले.

एकतेचा संदेश आणि जल्लोष

या घडामोडींनंतर काँग्रेसच्या प्रदेश युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार एकमेकांना मिठी मारताना दिसत असून, आम्ही एकत्र आहोत असा संदेश देण्यात आला आहे. भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि पक्षात कोणतीही फूट नसल्याचे दाखवण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली आहे. दुसरीकडे, सिद्धारमैया यांच्या राजीनाम्याची बातमी समजताच डीके शिवकुमार यांच्या समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा जल्लोष केला आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

काय होता सत्तावाटपाचा तो फॉर्म्युला?

कर्नाटक विधानसभेच्या 2023 मधील विजयानंतर सिद्धारमैया आणि डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्री पदावरून चुरस निर्माण झाली होती. त्यावेळी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी एक गुप्त समझोता केल्याची चर्चा होती. या फॉर्म्युल्यानुसार, सिद्धारमैया पहिल्या 2.5 वर्षांसाठी मुख्यमंत्री राहतील आणि त्यानंतरची अडीच वर्षे डीके शिवकुमार यांच्याकडे सत्ता सोपवली जाईल. मात्र, अडीच वर्षे पूर्ण होत आली तरी सिद्धारमैया पद सोडण्यास तयार नसल्याने नोव्हेंबर 2025 पासून अंतर्गत दबाव वाढला होता.

( नक्की वाचा : 8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग आणणार पगारवाढीची लाट, 400 टक्के पगार वाढणार? वाचा सर्व अपडेट )

भविष्यातील राजकीय वाटचाल

पक्षाच्या आदेशानुसार सिद्धारमैया यांनी राजीनामा दिला असला तरी, ते आता राष्ट्रीय राजकारणात जाणार की राज्यातच राहणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धारमैया यांना वरुणा मतदारसंघाचे आमदार म्हणून आपले कार्य सुरू ठेवण्यात अधिक रस आहे. 2028 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात राहून पक्षाचे काम करण्याची त्यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. या राजीनाम्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदी डीके शिवकुमार यांची  निवड होणार हे स्पष्ट झाले आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com