महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणावर INDIA आघाडीत जुंपली, ममतांचा राहुल गांधींवर पलटवार

Doctor Murder Case : कोलकातामधील आरजी कर हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणावर INDIA आघाडीमध्ये राजकीय लढाई सुरु झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Doctor Murder Case : कोलकातामधील आरजी कर हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणावर INDIA आघाडीमध्ये राजकीय लढाई सुरु झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे या प्रकरणावरुन आमने-सामने आले आहेत. या प्रश्नावर राहुल गांधी यांनी कोलकातामधील प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. ममता बॅनर्जी यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. 

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस शासित राज्यातील या प्रकरणाच्या घटनांची आठवण करुन देत राहुल गांधींवर पलटवार केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी INDIA आघाडीतील आणखी एक सहकारी पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही लक्ष्य केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले होते राहुल?

राहुल गांधी यांनी या प्रकरणावर बुधवारी सोशल मीडिया हँडल X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलं होतं की, 'कोलकातामधील ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या भयंकर प्रकारानं संपूर्ण देश स्तब्ध आहे. तिच्यासोबत घडलेल्या क्रूर आणि अमानवी घटनेमुळे डॉक्टर्स आणि महिलांमध्ये असुरक्षेची भावना आहे. पीडितांना न्याय देण्याच्या ऐवजी आरोपीला वाचवण्याचे सुरु असलेले प्रयत्न हॉस्पिटल आणि स्थानिक प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित करतात. '

ममतांचा पलटवार

राहुल गांधी यांच्या पोस्टला ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलं आहे. 'बंगालमध्ये डाव्या पक्षाचं सरकार होतं. त्यावेळी अनेक भयंकर गुन्हे घडलेले आहेत. काँग्रेसशासित राज्यांमध्येही या प्रकराच्या घडल्या आहेत. तुमच्या राज्यात या प्रकराच्या घटना घडल्या तेंव्हा तुम्ही काय कारवाई केली हा प्रश्न मला काँग्रेसला विचारयचा आहे,' असं ममता यांनी सांगितलं.

Advertisement

( नक्की वाचा : महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश )
 

तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष INDIA आघाडीचा भाग असले तरी त्यांचे संबंध तणावाचे राहिले आहेत. या पक्षांनी लोकसभा निवडणुका देखील स्वतंत्रपणे लढल्या होत्या. राहुल गांधींनी ट्विट करेपर्यंत काँग्रेस पक्षानं या प्रकरणावर मौन पत्कारलं होतं. काँग्रेसकडून या विषयावर फक्त प्रियांका गांधी - वाड्रा यांनी काळजीपूर्वक प्रतिक्रिया दिली होती.