महायुतीत झिशान सिद्दिकींना विरोध, सरमळकरांनी दंड थोपटले, वाद पेटणार?

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाकडे पाहीले जाते. मात्र 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या हातून गेला.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात सध्या जोरदार बॅनरबाजी सुरू आहे. या मतदार संघावरून महायुतीत वाद उफळण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व सध्या काँग्रेसचे झिशान सिद्दिकी हे करत आहेत. मात्र ते काँग्रेसची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा मतदार संघ महायुतीत अजित पवारांच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी शिंदे गटाच्या कुणाल सरमळकर यांनी या मतदार संघावर दावा करत थेट सिद्दिकींच्या उमेदवारीला विरोध केला आहे. याच मतदार संघात उद्धव ठाकरे राहातात. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

झिशान सिद्दिकी यांच्या उमेदवारी वरून पुन्हा एकदा शिंदे गटाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी त्यांना डिवचले आहे. दहीहंडीच्या निमित्ताने त्यांनी वांद्रे पूर्वी विधानसभा मतदार संघात जोरदार बॅनरबाजी केली आहे. त्यात त्यांनी चला शिवसैनिकांनो सज्ज व्हा! अहंकाराच्या हंड्या फोडुया, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात वांद्रे पूर्व मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवूया अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गर्वाची दहीहंडी फोडूया असंही या बॅनरवर लिहिण्यात आले आहे. शिंदेच्या नेतृत्वार चला फोडू विधानसभेची हंडी असा ही उल्लेख आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?

कुणाल सरमळकरांचे वडील श्रीकांत सरमळकर यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्यांनी या मतदार संघावर आता दावा केला आहे. या आधी त्यांनी झिशान यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेती होती. हिंदूत्वाचे धोरण सोबत घेवून झिशान यांचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न त्यांनी नेतृत्वाला केला होता. शिवाय सिद्दिकी यांचा प्रचार करण्यास असमर्थता दर्शवली होती. शिवाय या मतदार संघातून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!

वांद्रे पूर्वी मतदार संघात उद्धव ठाकरे यांचे घर आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून या मतदार संघाकडे पाहीले जाते. मात्र 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या हातून गेला. काँग्रेसचे झिशान  यांनी बाजी मारली. त्यामुळे हा मतदार संघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही कंबर कसली आहे. अशा वेळी अजित पवार काय भूमिका घेतात ह महत्वाचे ठरणार आहे. झिशान सिद्दिकी यांचे वडील माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी नुकताच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे झिशानही राष्ट्रवादीत जाणार हे स्पष्ट आहे. त्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्यामुळे वांद्रे पूर्वची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. अशात शिंदे गटाने दावा केल्याने इथे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Advertisement