पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रांचे वाटप करणार आहेत. वर्षाला एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक कमाई करणाऱ्या लखपती दीदींशीही ते संवाद साधतील. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान 2500 कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी जारी करतील. यावेळी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र स्वत: एकनाथ खडसेंनीच याला पूर्णविराम दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती मात्र आता एकनाथ खडसे यांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला असून पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचं आपल्याला निमंत्रण नसल्याचा एकनाथ खडसेंनी स्पष्ट केला आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम हा राजकीय नसून शासकीय आहे. त्यामुळे शासन म्हणून आमदाराला निमंत्रण दिलं जातं. पण अद्याप कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला मिळालं नसल्याने कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र आणि राजस्थान दौऱ्यावर आहेत. आज जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमादरम्यान 11 लाख नव्या लखपती दीदींना सन्मानित करतील आणि त्यांना प्रमाणपत्र देतील. याव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 2,500 कोटी रुपयांचा निधी जारी करतील. ज्याचा 4.3 लाख बचत गटांच्या सुमारे 48 लाख सदस्यांना फायदा होईल. ते 5,000 कोटी रुपयांचे बँक कर्ज देखील वितरित करतील, ज्यामुळे 2.35 लाख बचत गटांच्या 25.8 लाख सदस्यांना फायदा होईल. लखपती दीदी योजनेंतर्गत आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यात आले असून, सरकारने 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे ध्येय ठेवले आहे.
नक्की वाचा - पंतप्रधान मोदी रविवारी जळगाव दौऱ्यावर, एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत सस्पेंस कायम
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संभाव्य दौरा -
सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर आगमन
सकाळी 11.30 जळगाव लखपती दिदी महिला मेळाव्याला उपस्थित
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world