लाडकी बहीण योजने ज्या महिला पात्र ठरल्या होत्या, त्यांची आता पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकारने निकष ही लावले आहे. त्यानुसार ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना या पुढच्या काळात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र या योजनेचा गैरफायदा अनेक महिलांनी घेतल्याच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर आता पडताळणी केली जात आहे. त्यानुसार कुणाला या योजनेतून वगळण्यात आले आहे याची यादीच महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत माहिती देताना आदित तटकरे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटरवरून ट्वीट केले आहे. त्या त्या म्हणतात दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेतून वगळण्यात येत आहे. अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे असं सांगत कोणत्या महिलांना या योजनेचा या पुढे लाभ मिळणार नाही याची यादी त्यांनी शेअर केली आहे.
त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असलेल्या जवळपास 2 लाख 30, 000 महिला या लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. शिवाय ज्या महिलांचे वय 65 पेक्षा जास्त आहे अशा तब्बल 1,10,000 महिला अपात्र ठरल्या आहे. त्याच बरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1,60,000 इतकी आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 5 लाख महिला या लाडकी बहिण योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
याचा अर्थ ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, 65 वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या महिला, कुटुंबातल्या व्यक्तीच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिलांचा यात समावेश आहे. तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे, असंही आदित तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.
ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणीसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आता मिळणार हे गिफ्ट
ही योजना जाहीर झाल्यानंतर त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या योजनेचा फायदा महायुतीला झाला. निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळाले. त्यावेळी जवळपास 2 कोटी 52 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरवण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांच्या खात्यात दिड हजारा प्रमाणे रक्कमही जमा करण्यात आली होती. निवडणुकीनंतर मात्र सरकारने या योजनेसाठी पात्र महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. सध्याची राज्याची आर्थिक स्थिती पाहाता हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.