Rohini Acharya vs Tejashwi Yadav : राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि लालू यादव यांचे कुटुंब... राजकारणातील सर्वात शक्तिशाली घराण्यांपैकी एक. पण, आता बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतर (Bihar Election Defeat) या कुटुंबाच्या आत एक असा गृहकलह उफाळला आहे, ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. पक्षाचे प्रमुख लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी राजकारण सोडण्याचा आणि थेट आपल्या कुटुंबाशी संबंध तोडण्याचा घेतलेला निर्णय हा काही साधा अपघात नाही.
काय आहे कौटुंबीक कलहाचं कारण?
निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या एका गोपनीय बैठकीत दोन्ही भावंडांमध्ये म्हणजेच रोहिणी आचार्य आणि तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्यात काय घडले, ज्यामुळे चप्पल फेकीपर्यंत (Slipper throwing incident) प्रकरण गेले? कुटुंबाला आणि पक्षाला धक्का देणारी ही 'Inside Story' वाचताना तुम्हाला कळेल की या संघर्षाची बीजे खूप जुनी आहेत आणि त्याला खतपाणी घालणारे पक्ष आणि कुटुंबातील 'ते' दोन महत्त्वाचे लोक कोण आहेत.
लालूंच्या वारसदारांमध्ये झालेल्या या 'गृहयुद्धा'चे (Family War) कारण आणि परिणाम समजून घेण्यासाठी ही बातमी सविस्तर वाचा. ज्यामुळे तुम्हाला अनेक नव्या गोष्टी समजतील.
( नक्की वाचा : Bihar Election Results 2025: बिहारामध्ये 20 वर्षांपासून नितीशकुमार का जिंकत आहेत? 6 कारणांमध्ये दडलंय रहस्य )
पराभवाच्या आढावा बैठकीत झाला तो 'बॉम्बस्फोट'!
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) बिहार निवडणुकीत सहज विजय मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरजेडीची आढावा बैठक झाली. याच बैठकीत लालूंच्या कुटुंबातील संबंधांसाठी 'पॉईंट ऑफ नो रिटर्न' ठरलेला क्षण आला. या बैठकीत तेजस्वी यादव आणि रोहिणी आचार्य यांच्यात तीव्र वाद झाला.
रोहिणी आचार्य यांनी पक्षाचे खासदार संजय यादव यांच्याविरोधात आरजेडी कार्यकर्ते करत असलेल्या विरोधावर ठोस उपाययोजना करण्याची सूचना केली. मात्र, रोहिणीचा भाऊ, तेजस्वी यादव, याला ही सूचना आवडली नाही आणि याच क्षणी त्याने आपल्या बहिणीला असे काही बोलले ज्यामुळे रोहिणीच्या मनात खूप खोलवर जखम झाली.
सूत्रांनी दिलेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार, तेजस्वी यादव यांनी आपल्या बहिणीला थेट सुनावले, "आपण हरलो, कारण तू अपशकुनी आहेस. आमच्यावर तुझा शाप लागला आहे." हा केवळ शाब्दिक अपमान नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संतापलेल्या तेजस्वीने आपल्या मोठ्या बहिणीवर चप्पल फेकली आणि तिला शिवीगाळही केली. या अपमानजनक घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याचा अत्यंत कठोर निर्णय जाहीर केला.
( नक्की वाचा : Bihar Election Results 2025: अमित शाह यांचा 3 दिवसांचा 'तो' प्लॅन, ज्यामुळे NDA नं मिळवलं ऐतिहासिक यश )
संघर्षाची खरी कारणे आणि पडद्यामागील सूत्रधार
रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी, ज्यांनी आपल्या वडिलांना (लालू यादव) किडनी दान केली आहे, त्यांनी या संपूर्ण प्रकरणासाठी दोन व्यक्तींना थेट जबाबदार धरले आहे:
संजय यादव (RJD खासदार): रोहिणी यांच्या म्हणण्यानुसार, संजय यादवनेच त्यांना हे सर्व (राजकारण सोडणे) करण्यास सांगितले होते.
रमीझ नेमत खान (Rameez Nemat Khan): हा तेजस्वी यादवचा क्रिकेटच्या दिवसांतील जुना आणि अत्यंत जवळचा मित्र आहे.
आरजेडी सूत्रांनुसार, रमीझ नेमत खान तेजस्वीच्या कोअर टीमचा सदस्य असून तो पक्ष आणि मित्राचे सोशल मीडिया तसेच प्रचार टीमचे काम पाहतो. त्याचे आणि तेजस्वीचे संबंध क्रिकेटच्या मैदानापासून राजकारणापर्यंत घट्ट आहेत.
राजकारणातील एन्ट्री ते एक्झिट
या दोन भावंडांमधील कटुता काही एका दिवसात तयार झाली नाही. लालूंच्या वारसदारांमध्ये चाललेला हा संघर्ष गेल्या काही वर्षांपासून गुंतागुंतीचे रूप धारण करत होता. या निवडणुकीपूर्वी तेजस्वी यादवने स्वतः रोहिणीला सिंगापूरहून (Singapore) परत येऊन आरजेडीच्या प्रचारात मदत करण्याची विनंती केली होती. तेजस्वी राघोपूरमधून निवडणूक लढवणार असल्याने त्याने रोहिणीला याच मतदारसंघातून प्रचार करण्याचे आमंत्रण दिले. राघोपूर (Raghopur) हा त्यांच्या आई-वडिलांचा एकेकाळचा बालेकिल्ला होता.
प्रचारावरील मतभेद: रोहिणीला कुटुंबाची एकजूट दाखवण्यासाठी सारण जिल्ह्यातील (Saran District) प्रत्येक मतदारसंघात प्रचार करायचा होता, पण भावाने तिला फक्त राघोपूरला जाण्याची परवानगी दिली.
लोकसभा निवडणुकीचा संघर्ष: जुलै 2023 मध्ये, लोकसभेच्या निवडणुकीच्या एक वर्ष आधी, तेजस्वीने रोहिणीला सारणमधून निवडणूक लढवण्यास सांगितले होते. रोहिणीला पाटलीपुत्रमधून लढायचे होते, पण दुसरी बहीण मीसा भारती (Misa Bharti) यांच्या विरोधामुळे तिने अनिच्छेने सारणमधून निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत तिचा भाजपच्या राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव झाला होता.
पक्षातीलच 'षडयंत्र' आणि रोहिणीला लक्ष्य
सूत्रांच्या माहितीनुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दीड वर्ष आधीपासूनच कुटुंबात तणाव वाढू लागला. संजय यादव यांनी कुटुंबात हे मत मांडण्यास सुरुवात केली की, रोहिणी आचार्य भविष्यात तेजस्वीच्या राजकीय कारकिर्दीसाठी धोकादायक ठरू शकते. संजय यादव यांनी रोहिणीला राजकारण सोडून सिंगापूरला परत जाण्यासाठी अनेकदा सांगितले आणि तिचा सातत्याने अपमानही केला.
रोहिणी आचार्य यांच्या जवळच्या सूत्रांनी गंभीर आरोप केला आहे की, पक्षातील काही शक्तींनी त्यांचे सारणमधील प्रचार अभियान हेतुपूर्वक अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. या कटात सामील असलेल्यांपैकी एक व्यक्ती यादव कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि त्याला सारणमधून निवडणूक लढवण्याची इच्छा होती.
लोकसभा निवडणुकीतील पराभवावरून रोहिणीला सतत हिणवणाऱ्या आणि अपमानित करणाऱ्या दोन आमदारांना विधानसभा निवडणुकीत आरजेडीने तिकीट दिले. त्यामुळे लालू यादव यांच्या कुटुंबातील हा वाद आता केवळ गृहकलह राहिलेला नाही, तर तो आरजेडीच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभा करणारा अंतर्गत संघर्ष ठरला आहे.