'... तर ओबीसींचे उमेदवारही रिंगणात उतरवणार' हाकेंची मोठी घोषणा

जो पक्ष ओबीसोचे सर्वात जास्त उमेदवार देणार, त्यांनाच निवडून आणणार अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नांदेड:

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहे. त्याबाबतचा निर्णय ते लवकरच घेणार आहेत. त्यांनी उमेदवारांचे अर्ज आणि मुलाखतीही सुरू केल्या आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. हक्काचे आमदार विधानसभेत त्यासाठी बसावेत ही त्यांची संकल्पना आहे. त्यातून त्यांनी निवडणूक लढण्याच्या दृष्टीने पावलं टाकली आहेत. आता त्याच पावलांवर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनीही विधानसभा निवडणूक समाज्याच्या वतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणाच त्यांनी नांदेड इथे केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामाना रंगताना दिसण्याची दाट शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

लक्ष्मण हाके हे सध्या नांदेड दौऱ्यावर आहेत. त्या वेळी बोलताना त्यांनी ओबीसी समाजाचे उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचे भाष्य केले आहे. जो पक्ष ओबीसोचे सर्वात जास्त उमेदवार देणार, त्यांनाच निवडून आणणार अशी प्रतिक्रिया  लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. कोणत्याच पक्षाने ओबीसीचे जास्त उमेदवार दीले नाही तर ओबीसीचे उमेदवार उभे करणार असेही त्यांनी जाहीर केलं. ओबीसींच्या हक्काची भाषा करणारे उमेदवार विधानसभेत पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठा पाठोपाठ ओबीसी समाजाचेही उमेदवार रिंगणात दिसणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - '... तर शरद पवार चार वेळा पंतप्रधान झाले असते' हाके थेट बोलले

यावेळी हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टिका केली आहे. लोकसभा निवडणूक झाली आहे. आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यात आता ओबीसी नेते प्राध्यपक लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे. शरद पवार यांना ओबीसीचे अंतःकरण कळले असते तर पवार चारवेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असे वक्तव्य त्यांनी केले आहे. हाके हे नांदेड दौऱ्यावर असताना बोलत होते. शरद पवारांची पंतप्रधान होण्याची महत्वकांक्षा कधीही लपलेली नाही. पण त्यांना पंतप्रधान होता आले नाही हेही तितकेच खरं आहे. त्यामुळे पवारांच्या दुखत्या नसेवरच हाके यांनी बोट ठेवलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - जरांगे निवडणूक लढवण्याच्या तयारीत, आतापर्यंत 150 अर्ज; माजी आमदार-आमदारपुत्राचाही समावेश 

देशात लढायचे सोडून पवार अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसताय असा सवाल हाके त्यांनी यानिमित्ताने केला आहे. सात आठ महिने झाले तुम्ही ओबीसींच्या आरक्षणावर ब्र सुद्धा काढला नाही. लोकसभा निवडणुकीत तुम्ही पोळी भाजून घेतली. जर ओबीसीच्या व्यक्तीला निवडणुकीत उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर याचे आरक्षण तुम्ही काढून घेणार का असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. शिवाय पवार ओबीसीं बाबत काहीच बोलत नाहीत यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  
 

Advertisement