एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचावसाठी होत असलेले प्रयत्न सध्या राज्यात होताना पाहायला मिळत आहेत. या सर्व गदारोळात एका ऑडीओ क्लीपने खळबळ उडवून दिली आहे. ही ऑडीओ क्लीप दुसरी तिसरी कुणाची नसूर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची असल्याचं बोललं जात आहे. या ऑडीओ क्लीपच्या संभाषणातून हाके हे लोकांकडून कसे पैसे घेत आहेत हेच सुचित होत आहे. पण या ऑडीओ क्लिपची सत्यता NDTV मराठीने पडताळून पाहिलेली नाही. ही व्हायरल झालेली ऑडीओ क्लीप आहे. त्यात काय संभाषण झालं आहे यावर एक नजर टाकूयात.
या व्हायरल ऑडीओ क्लिपनुसार एका व्यक्तीने लक्ष्मण हाके यांना फोन केला. त्यानंतर तो त्यांना म्हणाला तुमच्या संघर्षामुळे आम्हाला हे यश बघायला मिळतं आहे. त्यामुळे या कामात आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो. त्यासाठी काही मानधन द्यायचं आहे असं तो हाके यांना म्हणतो. त्यावर हाके काय मानधन देणार? तुमचं गाव कोणतं? अशी विचारणा करताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहेत. त्यावर तो व्यक्ती मी अकलूजचा आहे. पुढे हाके म्हणतात भेटल्यावर द्या. पण समोरची व्यक्ती गुगपे, फोन पे वर करतो. तुमच्या युपीआय क्रमांक द्या असं बोलताना दिसत आहे.
नक्की वाचा - Mhada News: म्हाडाची घरं आणखी स्वस्त होणार, नव्या किंमत ऐकून तुम्ही ही व्हाल आवाक
सुरूवातीला ते पैसे घेण्यास नकार देतात. पण पुढे जेव्हा एक लाख द्यायचे आहेत असं सांगितल्यावर ते पैसे घेण्यास तयार होतात. त्यावर रितेश या व्यक्तीला हाक मारताना हाके ऐकले जावू शकतात. हा त्यांचा ड्राव्हर असल्याचं समजतं आहे. तो पुढे गुगल पे नंबर देतो. त्यानंतर हा संवाद अचानक बदलतो. समोरचा माणूस हाके यांना नको नको ते बोलताना या ऑडीओ क्लीपमध्ये ऐकले जावू शकते. भुजबळसाहेब तुम्हाला मदत करत आहेत. तुम्ही पैसे घेवून सुपाऱ्या घेत आहात. लोकांकडून पैसे घेवून जरांगे विरोधात बोलत आहात. समाजाच्या विरोधात काम करत आहात. जनाची नाही तर मनाची तरी तुम्हाला लाज वाटू द्या असं ही हा व्यक्ती सुनावतो.
पुढे अगदी शिवागाळ ही केलेलं या व्हायरल ऑडीओ क्लीप आहे. सुरूवातील हे दोघे ही चांगले बोलताना आढळत आहे. पण नंतर अचानक ट्रॅक बललेला पाहीयला मिळतो. ही ऑडीओ क्लिप दोन दिवसापूर्वीची असल्याचं बोललं जात आहे. जवळपास अडीच मिनिटं चर्चा झाली आहे. मात्र हा कॉल ट्रॅप करण्यासाठी आहे हे समजल्यानंतर हा कॉल ड्रॉप झाल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र ही क्लिप किती सत्य आहे हे अजूनही समोर आलेलं नाही. शिवाय हाके यांनीही याबाबत कोणतहं स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे ते काही याबाबत बोलतात का हे पाहावं लागणार आहे.