Political News : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा मेगा प्लान, जिल्हानिहाय नेत्यांची नेमणूक; कोणावर कोणती जबाबदारी?

महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवेंद्र कोल्हटकर, प्रतिनिधी

महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल 17 मे रोजी  शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले.  

Advertisement

ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे शिवसेना भवन येथून आदेश असून राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Ajit Pawar Speech : "माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं…", अजित पवारांनी केले शरद पवारांचं तोंड भरून कौतुक

कोणावर कोणती जबाबदारी?

1. ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर - सुभाष देसाई, राजन विचारे
2. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत
3. धुळे, अहिल्यानगर - अनिल परब, संजय राऊत
4. कल्याण - डोंबिवली - अनिल परब
5. उल्हासनगर, पनवेल शहर - अनंत गिते
6. अमरावती, अकोला - अरविंद सावंत
7. नागपूर, चंद्रपूर - भास्कर जाधव
8. वसई - विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर - विनायक राऊत
9. छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे
10. लातूर, सोलापूर - चंद्रकांत खैरे
11. परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर - अंबादास दानवे
12. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड - सुनील प्रभू