माढ्यात ट्वीस्ट? 'तो' आमदार अजित पवारांची साथ सोडायला तयार, पण...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
माढा:

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माढ्या राजकीय घडामोडांना मोठा वेग आला आहे.  माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे हे पुन्हा शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. त्या दृष्टीने त्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र  शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बबनदादा शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला आगे. बबन शिंदे हे शरद पवार गटात येणार असतील तर आम्ही दुसऱ्या पक्षात असू असा थेट इशाराच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी दिला आहे. त्यामुळे माढ्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सोलापूर जिल्ह्यात आहे.  या दौऱ्यावर असतानाच पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र माढ्याचे आमदार बबन शिंदे व पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना  पक्षात घेण्यास विरोध दर्शवला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी राशपच्या विरोधात काम केले होते.

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे हे अलीकडेच शरद पवार यांना भेटले होते. तर अभिजीत पाटील यांनी ऐनवेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. अशातच आता माढ्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील यांच्या पक्षप्रवेशाला व उमेदवारीला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे शिंदे आणि पाटील यांना आता मतदार संघातील स्थानिक कार्यकर्त्यांकडून मोठा धक्का बसला आहे. 

ट्रिंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशिल मोहिते पाटील विजयी झाले. बदललेल्या राजकीय स्थिती मुळे आता विधानसभेला स्थानिक नेते पक्ष बदलण्याच्या हालचाली करत आहेत. या सर्व घडामोडींवर शरद पवार यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे कोणाला पक्षात घ्यायचे आणि कोणाला घ्यायचे नाही याचा निर्णय शरद पवार घेणार आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी केलेल्या विरोधाकडे पवार कशा पद्धतीने पाहातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या सर्व घडामोडींमुळे माढ्यातील वातावरण मात्र तापलं आहे. 

Advertisement