Narayan Rane: गोगावलेंबाबतचा प्रश्न, नारायण राणेंचे उत्तर, विषयच संपवला

नारायण राणे हे विधान भवनात आले होते. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

नारायण राणे नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेतेपदा पर्यंत गेले. त्यांचा राजकारणातील आलेख नेहमीच चढता राहीला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मंत्री भरत गोगावले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते ही नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिह्ल्यात. विशेष म्हणजे त्यावेळी व्यासपीठावर त्यांचा मुलगा आणि आमदार निलेश राणे हे ही उपस्थित होते. राणें हे ऐवढ्या सहजासहजी पुढे गेले नाहीत. त्यांनी त्यासाठी मर्डरही केले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले होते. यावर नारायण राणे यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. मात्र विधान भवनात पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी एक वाक्यात  विषय संपवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नारायण राणे हे विधान भवनात आले होते. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भरत गोगावले यांनी तुम्ही केस अंगवार घेतल्या. मर्डर केले. त्यामुळेच पुढे गेले हे वक्तव्य केलं होतं. याबाबत विचारणा करण्यात आली. त्याला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले, कोण भरत गोगावले. मी त्यांना ओळखत नाही. असं म्हणत राणेंनी तिथून निघून जाणे पसंत केले. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचे पुत्र मंत्री नितेश राणे ही उपस्थित होते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ड्रग्ज प्रकरणात सापडल्यास थेट मकोका लागणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

दरम्यान या वक्तव्यानंतर भरत गोगावले यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यांच्या स्वपक्षातल्या नेत्यांनीही त्यांचे कान टोचल्याचं समोर आलं. त्यानंतर भरत गोगावले यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. शिवाय आपल्या तोंडून ते वक्तव्य अनावधानाने गेल्याचं त्यांनी सांगितलं. आपलं त्यामागे काही चुकीचा उद्देश नव्हता असं ही त्यांनी स्पष्ट केलं होतं. आता तर राणे यांनीच  हा विषय थांबला आहे. त्यांनी त्या टीकेकडे लक्षचं दिले नाही. शिवाय गोगावलेंना ओळखत नाही असं ही त्यांनी सांगितलं. 

Advertisement