
Maharashtra Assembly Session 2025: राज्यातील विविध भागात एमडी ड्रग्ज व इतर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात आता थेट मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत बोलताना ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
LIVE Updates: शेतकरी आत्महत्येवरुन घमासान, विरोधकांचा सभात्याग
आमदार परिणय फुकेंचा सवाल!
एमडी ड्रग्ज हा महाराष्ट्र आणि देशासाठी गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्रात तस्करांची संख्या वाढली आहे. फक्त युवकांमध्येच नाहीतर शाळकरी मुलांनाही या एमडीचे व्यसन लागले आहे. मुंबई, पुण्यासह भंडारा, गोंदियासारख्या ग्रामीण भागांमध्येही याची वाढ झाली आहे. या प्रकरणात अटक होणारे वर्षभरात जामीन मिळतो. सुटल्यानंतर ते पुन्हा तेच उद्योग करतात, त्यामुळे त्यांच्यावर मकोकासारखी कारवाई करणार का? असं भाजप आमदार परिणय फुके म्हणाले.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत, मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच आपण कायद्यात बदल करून त्यांना मकोका अंतर्गत कारवाई करता येईल असा निर्णय आपण याच अधिवेशनात आणत आहोत, अशी घोषणाही त्यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world