डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. चंद्रहार पाटील हे संजय राऊत यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. गेल्या काही दिवसापासून ते शिंदे गटाच्या संपर्कात होते. त्यामुळे ते ठाकरेंची साथ सोडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर त्यांनी ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं निश्चित केलं आहे. पण त्यांनी एका अटीवर शिंदे गटात प्रवेश करण्याचं ठरवलं असल्याचं सुत्रांकडून समजत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ते आता प्रवेश करणार आहेत. सोमवारी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना प्रवेश होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या मशालीची साथ सोडून ते आता एकनाथ शिंदेंचे धनुष्यबाण हातात घेणार आहे. उद्या रविवारी सायंकाळी 5 वाजता ठाण्यातील नेहरू नगर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय शिरसाट, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक हे ही उपस्थित राहाणार आहेत.
चंद्रहार पाटील यांचे सांगली जिल्ह्यात चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे त्यांच्या बरोबर जवळपास 5 हजार कार्यकर्त्यांची फौड शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलं आहे. हा प्रवेश होत असताना चंद्रहार पाटील यांना पक्षाकडून ताकद देण्याचे ही निश्चित झाल्याचे समजते. आगामी काळात पाटील यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येणार आहे. शिवाय आगामी स्थानक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटलांना मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या अटीवर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सांगली लोकसभेची निवडणूक लढवली होती. ही जागा काँग्रेसला हवी होती. पण शिवसेनेनं ती सोडली नाही. तिथे काँग्रेसने बंडखोरी केली. शिवाय काँग्रेसचे विशाल पाटील हे विजयी झाली. चंद्रहार पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. त्या पासून ते नाराज होता. त्यानंतर विधान सभा निवडणुकीतही ठाकरे गटाला सपाटून मार खावा लागला. त्यामुळे आपले राजकीय भवितव्य अंधारात असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यानंतर ते ठाकरे गटापासून चार हात लांब राहू लागले आहेत. आत तर त्यांनी शिंदे गटात जाण्याच निर्णय घेतला आहे.