सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुतळा कोसळला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख नेते भेट देण्यासाठी पोहोचले होते. त्याच वेळी खासदार नारायण राणेही राजकोटवर आले. त्यावेळी दोन्ही गटात चकमक झाली. गडावरच राडा झाला. नारायण राणे यांनी तर थेट धमती देत घरात खेचून एकएकाला मारून टाकेन अशी धमकी दिली. शिवाय गडावर आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची नाकेबंदी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदार नारायण राणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी कोसळला त्या राजकोटवर पाहाणीसाठी पोहोचले होते. त्याच वेळी महाविकास आघाडीचे नेते राजकोटवर पोहोचले. त्यात आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय विडेट्टीवार, जयंत पाटील हे सर्व नेते एकत्रीत त्याच वेळी पोहोचले. त्यामुळे गोंधळ उडाला. मविआच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. गडावर तणाव निर्माण झाला. त्यात खासदार नारायण राणे यांचा संताप अनावर झाला.
राणे यांना यावेळी पोलीस अधिक्षकांनाच धारेवर धरले. मी पाहणी करून नंतर पत्रकार परिषद घेणार होतो. तरी आमच्या जिल्ह्यात पोलीसांना कोणी अहकार्य करत असेल. तर त्यांना येवू द्या, त्यांना आमच्या अंगावर सोडा. त्यांचे काय करायचे ते बघतो. एकेकाला घरात खेचून रात्रीत मारून टाकेन, सोडणार नाही अशी थेट धमीच राणे यांनी पोलीस अधिक्षकां समोर दिली. ज्यावेळी आपल्या मागे कॅमेरा आहे हे राणेंच्या लक्षात आले. त्यानंतर ते पुन्हा चिडले. इथून जाता का? असा असे ते चिडून म्हणाले.
त्यानंतर राजकोटवर गोंधळ वाढला. राणे निघून गेले. पण त्यांचे कार्यकर्ते गडाच्या दरवाज्यावर अडून राहीले. आतमध्ये महाविकास आघाडीचे नेते अडकून पडले. त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दिला जात नव्हता. या सर्व प्रकरणात जयंत पाटील यांनी गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आले नाही. राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. तर तेवढीच आक्रमकता शिवसेना ठाकरे गटाने ही यावेळी दाखवली. त्यामुळे वातावरण स्फोटक झाले होते.