जाहिरात

शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

शिवरायांच्या पुतळ्याचं 3 वर्षांचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्यात आलं. इतक्या कमी कालावधीत पुतळ्याचं बांधकाम कसं आणि का पूर्ण करण्यात आलं हा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?
सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Statue of Chhatrapati Shivaji Maharaj) 26 ऑगस्ट रोजी अचानक कोसळला. आठ महिन्यांपूर्वी 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. उभारणीला अवघे आठ महिने झाले असताना पुतळा कोसळल्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याच्याविरोधात सिंधुदुर्गात गुन्हा दाखल झाला आहे. 

जयदीप हा ठाणे ल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहे. जयदीप आपटे हा अवघे 25 वर्षे वयाचा तरूण शिल्पकार आहे.  धक्कादायक बाब म्हणजे पुतळा उभारल्यानंतर त्याजिने भीतीही व्यक्त केली होती. आठ महिन्यांपूर्वी त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं. मात्र त्याच्या भीतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं का, असा सवाल उपस्थित होत आहे.  

शिवरायांच्या पुतळ्याचं 3 वर्षांचं काम 6 महिन्यात पूर्ण करण्यात आलं. इतक्या कमी कालावधीत पुतळ्याचं बांधकाम कसं आणि का पूर्ण करण्यात आलं हा सवाल उपस्थित केला जात आहे. सगळे व्यवस्थित पार पडले तर सगळीकडे नाव होईल पण जरा जरी चूक झाली तर सगळेच संपेल असे वाटले, अशी भीती त्याने व्यक्त केली होती. त्याने सांगितल्यानुसार, शिवरायांच्या पुतळ्याचे तीन नमुने बनवले होते. त्यातील 2 नौदल अधिकाऱ्यांच्या
सुचनेनुसार बनवण्यात आले होते. तिसरे शिल्प हे अचानक घडलेले होते पण नेमके तेच शिल्प निवडले गेले. कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी 3 डायमेन्शनल प्रिटिंगचा आधार घ्यायचं ठरवलं. जयदीप आपटे याच्यावर मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 28 फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा बनविण्याची जबाबदारी ही नौदलाकडून सोपविण्यात आली होती. या पुतळ्याचं कंत्राट हे मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंपनीला  काम देण्यात आले होते. ज्याचे प्रोप्रायटर आणि शिल्पकार हे जयदीप आपटे आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते.

नक्की वाचा - सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; अवघ्या 8 महिन्यांपूर्वी झालं होतं लोकार्पण

पुतळा स्टुडिओमध्ये जोडून मग जागेवर नेला जातो पण इथं ते शक्य नव्हतं, अशीही माहिती त्याने दिली होती. त्याने भीती व्यक्त केली होती. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष का केलं गेलं, असा सवाल विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकांकडूनही उपस्थित केला जात आहे.  

Switch To Dark/Light Mode
Previous Article
सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?
Prakash Ambedkar open offer to two big leaders because OBC reservation
Next Article
प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेपूर्वी मोठा प्लान; तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न, दोन मोठ्या नेत्यांना खुली ऑफर