INDIA आघाडीबाबत ममता बॅनर्जींचे मोठं विधान, कोणाचं टेन्शन वाढणार?

इंडिया आघाडीतील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, शरद पवार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांना संधी दिली पाहीजे असं सांगितलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे अशी मागणी आघाडीतील काही घटकपक्षांनी केली. तसा जाहिर पाठिंबाही त्यांना दर्शवण्यात आला. त्यामुळे इंडिया आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आघाडीत फुट पडते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता स्वत: ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडी बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने कोणाचं टेन्शन वाढणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ज्या नेत्यांनी आणि पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, त्यांचे ममता बॅनर्जी यांनी आभार मानले आहे. हा आपला सन्मान असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. त्यांनी यावेळी बोलताना इंडिया आघाडीत सर्व काही ठिक होवो अशी इच्छा व्यक्त केली. शिवाय ही आघाडी मजबूत झाली पाहीजे अशी प्रार्थनाही केली. लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांनीही ममता बॅनर्जींना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहीजे असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबतही ममता यांनी आभार मानले. इंडिया आघाडी बिहारमध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग बातमी -  40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन

इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याबाबत ममता यांनी अधिक बोलण्याचे टाळले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली होती. शिवाय आपल्याला संधी मिळाली तर आपण इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहोत असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर इंडिया आघाडीतल्या काही पक्षांनी ममता यांना पाठिंबा देत त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे असं सांगितलं होतं. 

ट्रेंडिंग बातमी - महत्वाची खाती भाजपकडेच राहाणार? मित्रपक्षाकडील खाती ही खेचून घेण्याची तयारी?

इंडिया आघाडीतील राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, शरद पवार, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल यांनी ममता बॅनर्जी यांना संधी दिली पाहीजे असं सांगितलं होतं. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्ही मोठ्या राज्यात लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर ममता यांनी नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या चर्चेला आता त्यांनी पूर्व विराम देत इंडिया आघाडी भक्कम झाली पाहीजे अशी इच्छा व्यक्त केली आहे. 

Advertisement