मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या दृष्टीने महत्वाची बैठक घेतली. ही बैठक पैठण फाटा या ठिकाणी छत्रपती भवन इथं पार पडली. या बैठकीत आगामी काळात मराठा आंदोलनाची धार तिव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शिवराज्यभिषेकाच्या दिवशी प्रत्येक गावात एक मराठा सेवक नियुक्त केला जाणार आहे. या मराठा सेवकांच्या माध्यमातूनच आरक्षणाचे आंदोलन आक्रमक पणे राबवले जाणार आहे. त्याचा मेगा प्लॅन तयार करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मराठा सेवक नेमताना काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार मराठा सेवक हा कोणत्याही पक्षाचा असू नये, त्याच्याकडे चांगले संघटन कौशल्य असावे. त्याचे चरित्र ही शुद्ध असावे. तो सुशिक्षित असावा. हे निकष निश्चित करण्यात आले आहेत. काही मराठी सेवक हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश या विभागीय पातळीवर समाजाचं काम करतली. ते इथल्या मराठा समाजातील लोकांच्या अडचणी समजून घेतली. समाजासाठी निस्वार्थ पणे हे काम करावे असं आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
आरक्षणाचा लढा याच माध्यमातून विजय मिळेपर्यंत करायचा आहे असंही ते यावेळी म्हणाले. सरकारला या पुढे लोकशाही मार्गाने धडा शिकवण्यासाठी या माध्यमातून लढा उभारायचा आहे असं ही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील मराठा मोठा झाला पाहिजे. यासाठी उद्योग व्यवसायात त्यानं मोठं करण्याचं काम या सेवकांच्या माध्यमातून करण्यासाठी गनिमी काव्याच्या माध्यमातून हे काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 6 जूनच्या आत मराठा सेवकांची टीम तयार केली जाणार आहे. शिवराज्यभिषेका दिवशी या मराठा सेवकांची घोषणा केली जाणार आहे.
मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या मराठा सेवकांनाचा आदर्श राज्यात उभा राहिला पाहिजे. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी पासून समाजातील प्रत्येक अडचणी या सेवकांना गावागावात सोडव्याच्या आहेत. गावप्रमुख,तालुका प्रमुख,जिल्हा प्रमुख असं पद या सेवकांना नसेल हे ही निश्चित करण्यात आलं. त्याच बरोबर मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय ही मराठा सेवक गावागावात बसून घेतील. लढ्यासाठी तयार राहा. आपल्याला आपली शक्ती दाखवायची आहे असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.